कोकणमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

🛑 शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक आदरणीय संभाजी भिडे गुरुजींची राजन रेडकर यांनी घेतली भेट..

 

🛑 भारतीय भ्रष्टाचार निवारण संस्थेच्या वतीने सिंधुदुर्गातील ग्रामपंचायत व जिल्हा परिषदेतील भ्रष्टाचाराच्या विषयातील बेमुदत आमरण उपोषणास शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचा जाहीर पाठिंबा व समर्थन ; रावसाहेब आनंदराव देसाई, राष्ट्रीय अध्यक्ष- शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान

🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज

अचूक बातमी थेट हल्ला

✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴सिंधुदुर्ग, दि-२३ :- भारतीय भ्रष्टाचार निवारण संस्थेच्या कोकण विभागाचे सीईओ व सतर्क पोलीस टाईम्स साप्ताहिकाचे सल्लागार संपादक राजन रेडकर यांनी आदरणीय संभाजी भिडे गुरुजींची सांगली येथे भेट घेतली. भेटीच्या दरम्यान संस्थेच्या माध्यमातून सिंधुदुर्गात करीत असलेल्या सामाजिक कामाचा आढावा गुरुजींना देण्यात आला. संस्थेच्या माध्यमातून सिंधुदुर्गात प्रामाणिकपणे करीत असलेल्या पारदर्शक कामांना गुरुजींनी समर्थन दिले असून संस्थेच्या पाठीशी असल्याचे गुरुजींनी आश्वासन दिले.

भारतीय भ्रष्टाचार निवारण संस्थेच्या माध्यमातून मुख्य कार्यकारी अधिकारी, सिंधुदुर्ग येथील ग्रामपंचायत व जिल्हा परिषदेच्या निधीतील विकास कामात झालेली अनियमितता व भ्रष्टाचाराच्या प्रकरणात यापूर्वी उपोषण करूनही, तसेच संबंधीत विभागाने कारवाई करण्याचे लेखी आश्वासन देवूनही अद्याप पर्यंत दोषींवर ठोस कारवाई झालेली नाही. त्यामुळे संबंधितांना जिल्हा परिषद पाठीशी घालत असल्याने, त्याबाबत निर्णय घेण्यास जाणीवपूर्वक विलंब करणाऱ्या चौकशी अधिकाऱ्यांवर मा.उच्च न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे व शासन परिपत्रकांन्वये जिल्हा परिषदेने कारवाई न केल्याने दिनांक २ ऑक्टोबर २०२१ रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे कार्यालय, ओरोस, सिंधुदुर्ग येथे संस्थेच्या वतीने बेमुदत आमरण उपोषण करण्यात येणार आहे. संस्थेच्या वतीने करीत असलेल्या बेमुदत आमरण उपोषणाच्या निवेदन मा.मुख्यमंत्री, मुख्य सचिव, ग्रामविकास मंत्री, विभागीय आयुक्त कोकण विभाग, जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग व मुख्य कार्यकारी अधिकारी ग्रा.प. जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांना देण्यात आलेली आहे. त्या निवेदनाची प्रत शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान चे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. रावसाहेब आनंदराव देसाई यांना त्यांच्या निवासस्थानी संस्थेच्या वतीने देण्यात आली. राष्ट्रीय अध्यक्ष रावसाहेब देसाईनी जिल्हा परिषदेतील अनियमितता व भ्रष्टाचारांच्या प्रकरणात भारतीय भ्रष्टाचार निवारण संस्था व सतर्क पोलीस टाईम्सच्या वतीने करण्यात येणाऱ्या बेमुदत आमरण उपोषणास शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचा जाहीर पाठिंबा असल्याचे मत जाहीर केले. त्याप्रसंगी शिवप्रतिष्ठान चे गुरुदत्त रावसाहेब देसाई, विनायक रामराजे पाटील (माऊली), बाळासाहेब जगदाळे तसेच संस्थेचे राजेश सातोसकर, रविंद्र राणे व परेश वालावलकर हे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!