कोकणमहाराष्ट्रवैभववाडीसामाजिकसिंधुदुर्ग

🛑 दाट धुक्यात करूळ घाटात रस्त्याच्या मध्यभागी अचानक ट्रक बंद..

 

वैभववाडी, दि-२२ :-* दाट धुक्यात करूळ घाटात रस्त्याच्या मध्यभागी अचानक ट्रक बंद पडल्याने या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. यामुळे अवजड वाहने घाटात अडकून पडली होती. तर दोन्ही बाजूने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. पहाटे चार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

याची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक अतुल जाधव, वाहतूक पोलिस विलास राठोड, संदीप राठोड, आरती राठोड, संतोष शिंदे, श्री कोलते यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी मार्गावरून एकेरी वाहतूक चालू केली. बिघाड झालेला ट्रक बाजूला केल्यानंतर दुपारी वाहतूक पूर्ववत झाली. मुसळधार पडणार्‍या पावसामुळे घाट रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. रस्त्याची डागडुजी न केल्यास अवजड वाहतूक या मार्गावरील बंद होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!