आणखीकुडाळकोकणशासकीयसिंधुदुर्ग

भंगसाळ नदी ” बंधाऱ्याच्या ठेकेदारावर ” जर त्याच वेळी फौजदारी गुन्हा दाखल झाला असता, तर हा त्रास गणेश भक्तांना सहन करावा लागला नसता – राकेश कांदे (माजी नगरसेवक)

🛑 ठेकेदाराचे पाप धुण्यासाठी जनतेच्या पैशातून खर्च करावा लागतो हे दुर्दैव , ठेक्यामध्ये राजकीय नेत्याची भागीदारी असली तरी घाबरू नये , प्रशासनाने धाडस करावे.

🛑 मुख्याधिकारी यांच्यावर कोणाचा दबाव आहे का ? अजून ही वेळ गेलेली नाही. बंधाऱ्याचा ठेकेदार कोणाचा नातेवाईक आहे का ?

🛑 गणेश घाट तोडून रस्त्याची दुर्दशा करून नदीपात्रात डंपर, फोकलँण्ड , जेसीबी नेणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करावी.

🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्युज

अचुक बातमी थेट हल्ला

✍️ प्रतिनिधी : प्रशांत मोरजकर

🎴कुडाळ : दि. १५ शहर येथील भंगसाळ नदीवरील बंधार्‍याचे काम बरीच वर्षे रखडत रखडत चालू होते. सदरच्या बंधाऱ्याच्या ठेकेदाराने सदर काम करतेवेळी कुडाळ नगरपंचायतीच्या अखत्यारीत असणार्‍या ग्रामपंचायत कालीन बांधलेल्या गणेश घाटाचे नुकसान करून गणेश घाटची तोडमोड करून तेथील जाणारा रस्त्यांवरून आपले जेसीबी, डंपर, फोकलँण्ड व इतर वाहने या ठिकाणावरून नदीपात्रात उतरवली, पुन्हा तो गणेश घाट सुस्थितीत करायचे सोडून हा ठेकेदार गायब झाला.

वास्तविक सार्वजनिक मालमत्तेची कोणी नुकसान केले तर त्यांच्यावर प्रशासन गुन्हा दाखल करते. परंतु या ठेकेदाराला केवळ एवढा साँफ्ट काँर्नर का? ठेकेदारमध्ये कुठल्या लोकप्रतिनिधीची पार्टनरशिप आहे का ? बंधाऱ्याला लागणारी खडी, स्टील, सिमेंट कोणी पुरवले. हे समजण्याइतपत जनता दुधखुळी नाही. परंतु संबंधित शासकीय मालमत्तेचे नुकसान करुन सदर ठेकेदाराने गणेश घाटाची मोडतोड केलेली आहे व सदर ठिकाणी जाणाऱ्या रस्त्याची ही दुरावस्था झालेली आहे.

तरी संबंधित ठेकेदाराकडून या दोन्ही गोष्टी सुस्थितीत करण्याबाबत लेखी निवेदन देऊन प्रशासनाकडे मागणी करून बरेच महिने झाले. परंतु त्याच वेळी जर प्रशासनाने सदरच्या ठेकेदाराकडून सदर गणेश घाट स्वखर्चातून बांधून घेतला असता व नगरपालिकेचे नुकसान भरून घेतले असते किंवा टाळाटाळ करीत असल्यास त्यावर शासकीय मालमत्तेचे नुकसान प्रकरणी गुन्हा दाखल केला असता. तर आज खऱ्या अर्थाने गणेश भक्तांना गणेश मूर्ती विसर्जनासाठी नदीकाठी जातेवेळी त्रासाला सामोरे जावे लागले नसते.

तरी या विषयाची प्रशासनाने दखल घेऊन आणि नागरिकांचा रोष आपल्यावर ओढवून घेण्यापेक्षा ज्या ठेकेदारामुळे या गणेश घाटाची आणि सदर रस्त्याचे नुकसान झाले, त्याच्यावर तात्काळ कारवाई करावी आणि त्याच्या स्वखर्चातून हा गणेश घाट बांधून घ्यावा. अन्यथा शासकीय मालमत्तेचे नुकसान प्रकरणी गुन्हा दाखल करावा किंवा याबाबत प्रशासनावर कोणाचा दबाव असल्यास त्या लोकप्रतिनिधीला गजाआड करावे.

गणेश घाट आणि पथदीप सुस्थितीत करणेबाबत नगरपंचायत प्रशासनाचे १ सप्टेंबर रोजी लेखी निवेदन दिले होते. नंतर २ सप्टेंबरला नियोजनाची बैठक झाली होती. संबंधित लेखी कागदपत्रे नगरपंचायतमध्ये उपलब्ध आहेत.

सविस्तर वाचण्यासाठी….👇👇👇👇👇👇

😍 *सुवर्णसंधी! सुवर्णसंधी…!*

🇮🇳 भारत सरकारचा उपक्रम *भारतीय आयुर्विमा महामंडळ* (LIC) मध्ये मेगा विमाप्रतिनिधी भरती *(पार्ट टाईम किंवा फुलटाईम).*

🎯 *योजनेचे लाभ* :- आकर्षक अमर्यादित कमिशन.

💰 (अनेक विमाप्रतिनिधींचे उत्पन्न पहिल्याच वर्षी : प्रतिमाह 25,000 ते 50,000 असते.)

💁‍♂ *अधिकचे फायदे* :-

● गृहकर्ज केवळ 5℅ दराने.

● कार, कॉम्पुटर, लॅपटॉप अ‍ॅडव्हान्स.

● देशात परदेशात विमान प्रवासाची संधी.

● ग्रॅच्युइटी (2 लाख), मेडिक्लेम, ग्रुप इंशुरन्स.

● मोफत ट्रेनिंग व सेमिनार.

● दरमहा दोन वेळा कमीशन.

● दिवाळी फेस्टिवल अ‍ॅडव्हान्स.

● स्वतंत्र ऑफिस टाकण्यासाठी व मोबाइल बिल अलाउंस.

● आपल्यानंतर नॉमिनीला कमिशन सुविधा

● कुठलीही गुंतवणूक नाही.

● आपला व्यवसाय, नोकरी संभाळून उर्वरित वेळात हे काम तुम्ही करू शकता.

 *⌛ मर्यादित जागा…⌛*

🎓 *शैक्षणिक योग्यता* :- कमीत – कमी 10वी किंवा कोणत्याही शाखेची पदवी.

*👉संपर्क : संदीप रोहिदास कोल्हे (LIC विकास अधिकारी)*

*📲मोबाईल नंबर – 9975169495 / 9405075919*

*🖥️कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*अचुक बातमी थेट हल्ला*

 

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*

https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

http://kokanlivebreaking.live

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

https://twitter.com/livekokan

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!