शासकीय मदतीची वाट न बघता ओवळीये येथील युवकांनी श्रमदानातून केली रस्त्याची साफसफाई
🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
_अचूक बातमी थेट हल्ला_
✍️ प्रतिनिधी :त्रिविक्रम सावंत
🎴सावंतवाडी, दि-२५ऑगस्ट :-सिंधुदुर्गात अनेक ठिकाणी रस्त्याच्या बाजूची साईड पट्टी ही वाढलेल्या झाडीमुळे गायब झाली असून अनेक गावात याचा त्रास वाहनधारकांना होत आहे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात वाहतूक गावागावात सुरू होत असल्याने अपघाताचे प्रमाण सुद्धा वाढणार आहे. हा धोका लक्षात घेता ओवळीये येथील युवकांनी ओवळिये ते देवसू पर्यंतचा हा मुख्य रस्त्याची साफसफाई केली. हा रस्ता वळणावळणाचा असून रस्त्याच्या दुतर्फा झाडे मोठ्या प्रमाणात वाढली होती. याचा त्रास वाहनचालकांना होत असल्याने गावातील सर्व युवकांनी एकत्र येत या रस्त्याचे दोन्ही बाजूची साईड पट्टीवर वाढलेल्या झाडीची श्रमदानाने साफसफाई केली. युवकांच्या या कार्याचे गावातील नागरिकांनी कौतुक केले. शासकीय मदतीची वाट न बघता केलेले हे काम प्रत्येक गावातील युवकांसाठी आदर्शवत आहे. यावेळी हनुमंत सावंत ,सरस्वती देसाई ,अजित सावंत महादेव देसाई,यांनी या युवकांच्या अल्पोपहाराची सोय केली.उपसरपंच सागर सावंत ग्रामपंचायत सदस्य मनोज सावंत, शिवराम सावंत ,सुधीर नाईक, प्रदीप सावंत ,प्रमोद सावंत रोहन सावंत, प्रशांत सावंत, सुरज राऊळ, चेतन दळवी,विकी सावंत भाग्यदीप सावंत , स्वप्नील जाधव या युवकांनी श्रमदानात भाग घेतला.
_*🏃♂️प्रवेश सुरू…प्रवेश सुरू…प्रवेश सुरू….🏃♂️*_
*_📚😍१०वी, १२वी, पदवीधर विद्यार्थी, नोकरदार, व्यावसायिक व महिलांसाठी शिक्षणातील सर्वोच्च संधी…😍_*
*● उपलब्ध शिक्षणक्रम:-*
*•बी.ए.*. *•बी.कॉम.*
*•एम.ए.* *•एम.कॉम.*
*•एम.बी.ए.* *•रूग्ण सहायक*
*🎓सिंधुदूर्ग जिल्ह्यातील विद्यापीठ मूल्यांकन ‘A श्रेणी’ प्राप्त अभ्यासकेंद्र*
*🎴प्रवेश अर्ज व माहितीसाठी संपर्क :-*
*यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ*
*डॉ. जे.बी.नाईक आर्टस् अँड कॉमर्स कॉलेज*
*आरपीडी ज्युनि. कॉलेज कॅम्पस, गेट नं. २ समोर,सावंतवाडी नगरपालिकेजवळ, सावंतवाडी.*
*मोबा. 8605992334*
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

