🛑 मालवण शहरात सुरू असलेल्या जुगाराचे वृत्त कोकण लाईव्ह ब्रेकिंगने प्रसिद्ध करताच अवैद्य व्यावसायिकांबरोबरच ‘खाकीचे’ देखील धाबे दणाणले..
🛑 युवा पिढीच्या भावनांशी खेळणाऱ्या या धंद्यांना आळा बसावा हीच आमची प्रामाणिक इच्छा..
🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
अचूक बातमी थेट हल्ला
✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴सिंधुदुर्ग, दि-२१ :- मालवण शहरात सुरू असलेल्या जुगाराचे वृत्त कोकण लाईव्ह ब्रेकिंगने प्रसिद्ध करताच अवैद्य व्यावसायिकांबरोबरच ‘खाकीचे’ देखील धाबे दणाणले आहेत. बातमीचा धसका घेत पोलिसांच्या आशीर्वादाने रातोरात जुगार अड्डा खारेपाटण-राजापूर सीमेवरील हॉटेलमध्ये हलविण्यात आल्याचे खात्रीलायक वृत्त कोकण लाईव्हला मिळाले आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात राजरोसपणे सुरू असलेल्या अवैद्य धंद्यांचा कोकण लाईव्हने जाहीर पर्दाफाश केला होता. अवैद्य व्यावसायिकांना कोण कशी मदत करतो? कोणाचे खिसे कसे भरले जातात, याची जंत्रीच कोकण लाईव्हकडे आहे. योग्य वेळी ही जंत्री बाहेर काढून युवा पिढीच्या भावनांशी खेळणाऱ्या या धंद्यांना आळा बसावा हीच आमची प्रामाणिक इच्छा आहे.
मालवण मधील जुगार व्यवसायाची बातमी प्रसिद्ध होताच व्यावसायिकांच्या मर्जित असलेल्या खाकितील शुक्राचार्यांनी ताबडतोब येथील अड्डा हलविण्याच्या गुप्त सूचना दिल्या. त्यानुसार केवळ तासाभरात येथील अड्डा सिंधुदुर्ग-रत्नागिरीच्या सीमेवर एका हॉटेलमध्ये हलविण्यात आला. याठिकाणी देखील खाकीच्या आशीर्वादाने पुन्हा जुगाराचे बस्तान बसविण्यात आले आहे. विशेष म्हणजे खारेपाटण पोलीस तपासणी नाक्यापासून जवळच हा अड्डा बेकायदा सुरू करण्यात आला आहे. एका रात्रीत लाखोंची उलाढाल होत असलेल्या या अड्ड्यावर पोलिस कारवाई करतात की नेहमीप्रमाणे ‘क्लिनचिट’ देतात हे पाहणे रंजक ठरेल.

