कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या मारेकऱ्यांना लवकरात लवकर जेर बंद करा*.

 

*▪️अंधश्रद्धा निर्मुलन संघटनेचे सावंतवाडी तहसीलदार राजाराम म्हात्रे यांना निवेदन*

*🖥️ Kokan Live Braking News*

*✍️ ब्यूरो न्यूज:-कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सावंतवाडी,दि,:-२० ऑगस्ट*
२०ऑगस्ट २०२१ ला डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या निर्घृण खूनाला आठ वर्षे पूर्ण होत आहेत. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनातील संशयित आरोपी म्हणून सीबीआयने २०१६ मध्ये वीरेंद्र तावडे, ऑगस्ट २०१८ मध्ये शरद कळसकर आणि सचिन अंदुरे व मे २०१९ मध्ये संजीव पुनाळेकर व विक्रम भावे यांना अटक करून त्यांच्यावर आरोपपत्र दाखल केलेले आहे. अमोल काळे या संशयित आरोपीविरुद्ध सीबीआयने अजूनही आरोपपत्र दाखल केलेले नाही. तसेच अमित डिगवेकर व राजेश बंगेरा या संशयित आरोपींच्या विरुद्ध देखील अजूनही आरोपपत्र दाखल करण्यात आलेले नाही. या खुनाचा तपास वीरेंद्र तावडे व अमोल काळे यांच्या नावापर्यंत येऊन थांबलेला आहे. या खुनामागील सूत्रधार कोण आहेत,त्यांचा लवकरात लवकर शोध घेऊन त्यांना अटक करावी अशी मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने आज सावंतवाडी तहसीलदार राजाराम म्हात्रे यांना निवेदन देऊन करण्यात आली.
मुख्य आरोपी कोण हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे, प्रा. कलबुर्गी व गौरी लंकेश या चारही खुनांचे एकमेकांत गुंतलेले धागेदोरे तपास यंत्रणांनी उकलले आहेत. या गुन्हयांमधील काही संशयित आरोपी समान आहेत. तसेच दोन समान शस्त्रे या चार खुनांमध्ये वापरलेली आहेत. बंगळुरू येथील न्यायवैदयकीय प्रयोगशाळेच्या अहवालानुसार डॉ. दाभोलकर व कॉ. पानसरे यांच्यावर एकाच बंदुकीतून गोळ्या झाडण्यात आलेल्या आहेत. न्यायालयात दाखल केलेल्या शस्त्रविषयक अहवालानुसार का पानसरे यांच्या खुनासाठी वापरलेले एक पिस्तुल प्रा. कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांच्या खुनासाठी देखील वापरले आहे.
या चारही खुनांच्या संदर्भातील शेवटची अटक जानेवारी २०२०मध्ये झालेली आहे. कर्नाटक एस. आय. टी. ने झारखंड या राज्यातून ऋषिकेश देवडीकर या गौरी लंकेश खुनातील संशयित आरोपीला अटक केलेली आहे. तो तेथे पेट्रोल पंपावर काम करत होता. यावरुन हे खून करणाऱ्या गटाच्या यंत्रणेने किती लांबवर हात पसरले आहेत हे लक्षात येईल. सीबीआयने दाखल केलेल्या पुरवणी आरोपपत्रात असे म्हटले आहे की, सदर खुनाचा तपास करताना या प्रकरणातील संशयित आरोपीचा कॉ. गोविंद पानसरे, प्रा. कलबुर्गी व गौरी लंकेश यांच्या खुनाशी असलेला संबंध रेकॉर्डवर आलेला आहे व त्यातून हे स्पष्ट झाले आहे की, ही फक्त खुनाची घटना नसून हे दहशतवादी कृत्य आहे. त्यामुळे या गुन्ह्यातील आरोपींना Unlawful Activities Prevention Act 1967 हा कायदा लावण्यात आलेला आहे.
पुढील तपास होऊन डॉक्टर नरेंद्र दाभोलकरांच्या खुनामागील सूत्रधार कोण आहेत, सीबीआयने शोधून काढले पाहिजे अन्यथा देशातील विवेकवादी विचारवंत, कार्यकर्ते, पत्रकार यांच्या अभिव्यक्तीला असलेला धोका संपणार नाही, त्यामुळे या खुनाच्या मागील सूत्रधारांना लवकरात लवकर अटक करावी, अशी मागणी या निवेदनाच्या माध्यमातून केली आहे.
यावेळी डॉक्टर विजयालक्ष्मी चिंडक महेश परूळेकर वासंती परूळेकर अमोल कदम, नंदकुमार पाटील उपस्थित होते.

*👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*

 

*🔐लाँकडाऊन आहे… 🎂वाढदिवस साजरा करायचा आहे काळजी करु नका घरपोच केक उपलब्ध होईल चिंता कसली…..🎂*

सावंतवाडी मध्ये आपल्या हक्काचे *😍हाऊस आँफ केक😍*

*▪️ब्लॅक फॉरेस्ट*
*▪️व्हाईट फॉरेस्ट*
*▪️पायनॅपल*
*▪️बटरस्कॉच*
*▪️मॅंगो*
*▪️स्ट्रॉबेरी*
*▪️ब्लॅक करंट*
*▪️चॉकलेट क्रीम*
*▪️रसमलाई*
*▪️फोटो केक*
*▪️स्पेशल थीम केक*
*▪️पिनाटा केक*

_🎊अगदी माफक दरात केक खरेदी करा आणि आपल्या हिंतचिंतकाचे वाढदिवस साजरे करा🎊_
*संपर्क:-* *सुरज लाड*
बिरोडकर टेंब सावंतवाडी
7307367856/7385501506

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FiUpx9Y03kdHjAHlJAYwkX

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!