पुणेकरांसाठी मोठी घोषणा; निर्बंधात मोठी शिथिलता…
🛑सोमवार ते शुक्रवार सर्व दुकाने सकाळी ७ ते रात्री ८ पर्यंत सुरू राहणार असून, पुण्यातील सर्व हॉटेल्स रात्री १० वाजेपर्यंत सुरू राहणार…
🛑शनिवारी आणि रविवारी दुकानं दुपारी ४ वाजेपर्यंत सुरू राहणार…
🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
अचूक बातमी थेट हल्ला
✍️प्रतिनिधी : सुर्यकांत जाधव
🎴पुणे : दि. ०८ : पुण्यातील निर्बंधात शिथिलता देण्याबाबत उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी मोठी घोषणा केली आहे. आज त्यासंदर्भात घेण्यात आलेल्या निर्णयानुसार पुणे आणि पिंपरी-चिंचवड या शहरांसाठी राज्य सरकारने मोठी शिथिलता दिली आहे. आज घेतलेल्या निर्णयानुसार पुणे आणि पिपंरी-चिंचवड शहरात सोमवार ते शुक्रवार सर्व दुकाने सकाळी ७ ते रात्री ८ पर्यंत सुरू राहणार असून पुण्यातील सर्व हॉटेल्स रात्री १० वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. तसेच पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील मॉल्स रात्री ८ वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. मात्र दोन्ही लशी घेणाऱ्यांनाच मॉलमध्ये प्रवेश देण्यात येणार आहे.
तसंच, शनिवारी आणि रविवारी दुकानं दुपारी ४ वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. ग्रामीण भागात कोरोनाची परिस्थिती चिंताजनक आहे. , मास्क वापरणे, दुकानं आणि मॉलमधील कर्मचाऱ्यांचे लसीकरण बंधनकारक असणार आहे. जर पॉझिटिव्ह रेट ७ टक्क्यांच्या पुढे गेला तर पुन्हा एकदा निर्बंध लावले जातील, असा इशाराही अजित पवारांनी दिला

