निवती, म्हापण,केळूस, मालवण मार्गावर कुडाळ आगाराची रविवार पासून एस टी बस सेवा सुरु

निवती, म्हापण,केळूस, मालवण मार्गावर कुडाळ आगाराची रविवार पासून एस टि बस सेवा सुरु

समीर चव्हाण

कुडाळ एसटी आगारातून ८ ऑगस्ट पासून निवती, केळूस, व मालवण या मार्गावर एसटी बस वाहतूक सेवा सुरू करण्यात येणार आहे.
कोरोना कालावधीत एसटी बस सेवा बंद होती ती पूर्ववत सुरू करावी अशी मागणी प्रवासी वर्गातून होत होती, याची दखल घेऊन कुडाळ आगाराने ८ ऑगस्ट पासून काही भागातील बससेवा सुरू केली आहे.
म्हापण निवती मार्गावर कुडाळ वरुन सायंकाळी ५.3० वा कुडाळ पाट म्हापण निवती बस सुटून ती ६.3० वा. निवतीला पोहचेल. आणि वस्तीला राहील. दुसरे दिवशी सकाळी निवती वरुन सकाळी ७.3० वा बस सुटून कुडाळला ८.30 वा पोहचेल. तर दुपारी 12 वा. कुडाळ निवती अशी बस सुटून १ वा निवतीला पोहचेल. १.१० वा निवती वरुन सुटून २.१० ला कुडाळला पोहचेल.
कुडाळ केळूस बस कुडाळ वरुन सायंकाळी ६ वा सुटून केळूसला ७ वा. पोहचेल व वस्तीला थांबेल. ही बस सकाळी ७.3० वा केळूस वरुन सुटून ८.३० वा कुडाळला पोहचेल. तर दुपारी १ वा कुडाळ केळूस बस सुटून २ वा केळूसला पोहचेल. २.१० वा केळूसहुन सुटून ३.१० वा कुडाळला पोहचेल.
तर कुडाळ मालवण बस कुडाळ वरुनसकाळी ९.४० वा. सूटून १०.४० ला मालवणला पोहचेल. आणि ११ वा मालवण वरुन सुटून दुपारी 12 वा .कुडाळला पोहचेल.
यापूर्वी कुडाळ आगारातुन भोगवे, घोडगे, शिवापूर मार्गावर बस सुरु केल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!