सांगेली दशक्रोशीत ढग फुटी सदृश्य पावसामुळे धवडकी येथे जलप्रलय…………संपूर्ण बाजारपेठेत घुसले पाणी व्यापाऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान
🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
_अचूक बातमी थेट हल्ला_
✍️ प्रतिनिधी :त्रिविक्रम सावंत
🎴माडखोल, दि२१जुलै- :-सांगेली दशक्रोशीत सह्याद्रीच्या पट्ट्यात ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने नदीच्या पुराचे पाणी धवडकी येथील संपुर्ण बाजारपेठेत घुसल्याने जवळ जवळ सर्व बाजारपेठेतील दुकानात व घरात पाणी घुसले मध्यरात्री साडे बारा नंतर घुसलेल्या पुराच्या पाण्याने कोट्यावधी रुपयांचे नुकसान केले असून कोव्हिडमुळे आधीच व्यवसाय ठप्प होते त्यातच दुकानातील सामानाचं पुराच्या पाण्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे व्यापारीवर्ग हतबल झाला आहे. काल रात्री सात वाजल्यानंतर रात्रभर आंबोली घाटात ढग फुटी झाल्यामुळे गेल्या पन्नास वर्षात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या पुर आला. धवडकी पासून ते माडखोल मेट वाडी पर्यंत सावंतवाडी बेळगाव महामार्गावर जवळपास सहा ते सात फूट पाणी होते. येथील बँक ऑफ इंडियाच्या शाखेमध्ये गुडघाभर पाणी घुसल्याने संपूर्ण संगणक प्रणाली बंद पडली असून चिखलाचे साम्राज्य पसरले आहे तसेच रस्त्याच्या बाजूला असलेल्या श्रद्धा नर्सरी ची आंब्याची नारळाची व सर्व फुल झाडांची कलमे वाहून गेली असून येथील काही रिक्षा देखील वाहून गेल्या ग्रामस्थांनी गाड्या अक्षरश: दोरीने बांधून ठेवल्या. प्रशासनातर्फे आता पंचनाम्याचे काम सुरू असून नुकसानीचा आकडा जवळपास कोट्यावधीच्या घरात आहे. अचानक घुसलेल्या पुराच्या पाण्यामुळे ग्रामस्थांना घरातील जीवनावश्यक वस्तू देखील वाचवता आल्या नाहीत.
*
🏃♂️प्रवेश सुरू…प्रवेश सुरू…प्रवेश सुरू….🏃♂️*_
*_📚😍१०वी, १२वी, पदवीधर विद्यार्थी, नोकरदार, व्यावसायिक व महिलांसाठी शिक्षणातील सर्वोच्च संधी…😍_*
*● उपलब्ध शिक्षणक्रम:-*
*•बी.ए.*. *•बी.कॉम.*
*•एम.ए.* *•एम.कॉम.*
*•एम.बी.ए.* *•रूग्ण सहायक*
*🎓सिंधुदूर्ग जिल्ह्यातील विद्यापीठ मूल्यांकन ‘A श्रेणी’ प्राप्त अभ्यासकेंद्र*
*🎴प्रवेश अर्ज व माहितीसाठी संपर्क :-*
*यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ*
*डॉ. जे.बी.नाईक आर्टस् अँड कॉमर्स कॉलेज*
*आरपीडी ज्युनि. कॉलेज कॅम्पस, गेट नं. २ समोर,सावंतवाडी नगरपालिकेजवळ, सावंतवाडी.*
*मोबा. 8605992334*
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

