🛑 प्राथमिक शिक्षक कला मंच कुडाळ, सिंधुदुर्ग आँनलाईन अभंग गायन स्पर्धेस उदंड प्रतिसाद..
🛑 प्राथमिक शिक्षक कला मंच कडून पहीले पुष्प..
🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
अचूक बातमी थेट हल्ला
✍️ प्रतिनिधी:शैलेश गवस
🎴बांदा, दि-१८ :- प्राथमिक शिक्षक कला मंच कुडाळ यांच्या वतीने खास आषाढी एकादशीच्या निमित्ताने घेण्यात आलेल्या अभंग गायन स्पर्धेस उदंड प्रतिसाद लाभला आहे. इयत्ता पहीले ते आठवी या गटात सदर स्पर्धा आँनलाईन पद्धतीने घेण्यात आली असुन सदर स्पर्धेस उदंड प्रतिसाद लाभला. या स्पर्धेत जवळपास १५० विद्यार्थ्यांनी या सहभाग घेत आपली गायनाची कला सादर केली. या स्पर्धेचे परिक्षण परिक्षक करत असून लवकरच या स्पर्धेचा निकाल देण्यात येणार असल्याचे प्राथमिक कला मंच कुडाळ यांनी सांगितले. कोरोनो कालावधी शिक्षण पद्धती आँनलाईन सुरू आहे. त्यातचं मुलांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा या उद्देशाने प्राथमिक कला मंच कुडाळ याच्या मार्फत ही स्पर्धा आँनलाईन पद्धतीने घेण्याचे ठरवले. या स्पर्धेला भरभरून प्रतिसाद मिळला आहे.
प्राथमिक कला मंच कुडाळ यांनी सामाजिक भावनेतून अनेक उपक्रम राबवण्याचे ठरवले आहे. सामाजिक उपक्रम सुद्धा या कला मंच कडून राबविण्यात आले आहेत.

