🛑 कसाल कुंभारवाडी रस्त्यावर काजवेला भगदाड..
🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
अचूक बातमी थेट हल्ला
✍️ प्रतिनिधी : सुनील आचरेकर
🎴सिंधुदुर्गनगरी, दि-१६ :- मुंबई-गोवा महामार्गलगत कुडाळ तालुक्यातील कसाल कुंभारवाडी जाणाऱ्या रस्त्याच्या काजवेला मोठा खड्डा पडला आहे .हा मार्ग वाहतुकीस धोकादायक बनला आहे. संबंधित विभागाने या काजवेची डागडुजी करावी अशी मागणी वाहनचालक व प्रवासी वर्गातून होत आहे. या मार्गावरून रात्रंदिवस वाहनांची वर्दळ असते मोटरसायकल, रिक्षा,कार आदी वाहनांच्या चालकांना कसरत करत वाहने चालवावी लागत आहेत. गेल्या वर्षी याच ठिकाणी भगदाड पडले होते. तेव्हा महामार्ग ठेकेदारा कंपनी ने या खड्ड्यात तात्पुरती मलमपट्टी केली होती. लोकप्रतिनिधींकडून या पुलाची पाहणी करण्यात आली होती मात्र पुढे काय झाले याचे कारण अद्याप गुलदस्त्यात आहे .दुरुस्ती न झाल्यास या मार्गावरची वाहतूक बंद होण्याच्या मार्गावर आहे संबंधित विभागाने वेळीच लक्ष देऊन कायमस्वरूपी उपाय योजना करावी अशी मागणी या भागातील वाहनचालक व प्रवासी व ग्रामस्थांमधून केली जात आहे.

