🛑 कसाल पोखरण मार्गावर अनेक धोकादायक झाडे..
🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
अचूक बातमी थेट हल्ला
✍️ प्रतिनिधी : सुनील आचरेकर
🎴सिंधुदुर्गनगरी, दि-१६ :- कसाल पोखरण मार्गावर धनगरवाडी व कुंदे माळ येथे आकाशीची भली मोठी झाडे रस्त्यावर झुकलेल्या अवस्थेत आहेत वादळी वाऱ्यात झाडे रस्त्यावर कोसळण्याचा धोका आहे. नेहमी रहदारी असणाऱ्या मार्गावरील धोकादायक स्थितीत असलेली झाडे हटविण्याची मागणी वाहनचालक मधून होत आहे. वादळी वाऱ्यामुळे जिल्ह्यातील अनेक रस्त्यांवर झाडे उन्मळून पडणे वाहनचालकांना इजा पोहोचणे असे प्रकार यापूर्वी घडले आहेत. कसाल पोखरण मार्गावरील ही झाडे धोकादायक स्थितीत असून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे ही झाडे हटवण्याची मागणी वाहनचालक प्रवासी वर्गातून होत आहे .

