कोकणमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

🛑 वाघोटन नदी किनाऱ्यावरील गावांना सतर्कतेचा इशारा..

🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज

अचूक बातमी थेट हल्ला

✍️ प्रतिनिधी : सुनिल आचरेकर

🎴सिंधुदुर्गनगरी, दि-१२ :- खारेपाटण पुलाजवळ आज सायंकाळी 5 वा. मोजलेल्या पाणीपातळीनुसार वाघोटन नदीची पातळी 8.250 मीटर इतकी असल्याची माहिती दक्षिण कोकण पाटबंधारे प्रकल्प मंडळ यांनी दिली आहे. या नदीची इशारापातळी 8.500 मीटर असून धोका पातळी 10.500 मीटर आहे. सध्या जिल्ह्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर वाघोटन नदीच्या किनाऱ्यावरील गावांनी सतर्क रहावे.

तिलारी नदीची पाणीपातळी तिलारीवाडी येथे 38.500 मीटर आहे. या नदीची इशारा पातळी 41.600 मीटर धोका पातळी 43.600 मीटर इतकी आहे. तर कर्ली नदीची पातळी भंकसाळ नदी पुलाजवळ 7 मीटर आहे. कर्ली नदीची इशारा पातळी 9.910 मीटर आणि धोका पातळी 10.910 मीटर इतकी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!