कोकणमहाराष्ट्ररत्नागिरीसामाजिक

🛑 आरोग्य सभापती शशिकांत मोदी व नगरसेविका सौ.सई चव्हाण यांनी घेतली घनकचरा प्रकल्प तक्रारीची दखल..

🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
अचूक बातमी थेट हल्ला

✍️ प्रतिनिधी : संतोष पिलके

🎴चिपळूण, दि-१२ :- चिपळूण नगरपरिषदेचा घनकचरा प्रकल्प शिवाजीनगर येथील वरील बाजूस असून या प्रकल्पामुळे पाग झरी येथील असणाऱ्या पऱ्याला काळे पाणी येणे, दुर्गंधी याबाबतची तक्रार पागझरी येथील नागरिक नागेश चितळे, रवि घाडगे, सुहास गुरसाळे, संजय गोरीवले, सुरज लटके, गोटया लटके, गणेश कांबळी यांनी स्थानिक नगरसेविका सौ. सई चव्हाण यांच्याकडे केली. या तक्रारीची दखल घेत सदर विषय आरोग्य सभापती शशिकांत मोदी यांच्याशी चर्चा केली व प्रत्यक्षात जाऊन आरोग्य सभापती शशिकांत मोदी, शिवसेना उपशहरप्रमुख सुयोग चव्हाण, रत्नागिरी टाईम्सचे चिपळूण शाखेचे व्यवस्थापक नंदकुमार चिटणीस, पाग विभागातील नागरिक संजय गोरीवले, सुरेश लटके, कुलकर्णी यांनी पाहणी केली. पाहणीनंतर आरोग्य सभापती मोदी यांनी सांगितले कि, सदर प्रकल्पातील आवश्यक असणारी जागा प्रकल्पासाठी ठाणे येथील एका संस्थेला देण्यात येणार असून ती संस्था कचऱ्यापासुन निर्मिती करणार आहे. सदर प्रस्ताव नगरपालिकेने तयार आहे. परंतु कोरोना व लॉकडाऊन मुळे काम थांबले असून लवकरच ते पूर्ण होईल व नागरिकांना होणारा त्रास बंद होईल. तसेच ज्या भागात हा त्रास जाणवत आहे तिथे त्वरित फवारणी करण्यात येईल. तसेच स्थानिक नगरसेविका सौ. सई चव्हाण यांनी सांगितले कि, याबाबत आपण मुख्याधिकारी यांच्याशी चर्चा करणार असून सदर विषय लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार आहोत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!