आणखीकरियरकोकणशैक्षणिकसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

इंटरनेटच्या अभावी होत आहे मुलांचे शैक्षणिक नुकसान

🛑 नेटवर्कच्या गैरसोयमुळे विध्यार्थी शिक्षणापासुन वंचित – रविंद्र तावडे

🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्युज

अचुक बातमी थेट हल्ला

✍️कार्यकारी संपादक -आनंद धोंड

🎴सावंतवाडी : दि. ०७ तालुक्यातील कलंबिस्त गाव हा सैनिकी गाव म्हणून जिल्ह्यात परिचित आहे. या गावात सर्व प्रकारच्या सोयी सुविधा उपलब्ध आहेत, मात्र काही ठिकाणी पुरेशा प्रमाणात इंटरनेट चे नेटवर्क नसल्याने येथील लोकांना मोठया अडचणींना सामोरे जावे लागत आहे. यातच महाराष्ट्र सरकारने ऑनलाइन शिक्षण पद्धती जाहीर केल्याने येथील विद्यार्थ्यांना इंटरनेट अभावी ऑनलाइन शिक्षण पद्धतीचा लाभ घेता येत नसल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.

या गोष्टीकडे तातडीने लोकप्रतिनिधी आणि स्थानिक राजकीय पुढारी यांनी लक्ष देऊन गावात इंटरनेटची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी कलंबिस्त येथील सामाजिक कार्यकर्ते रवींद्र तावडे यांनी कोकण लाईव्ह ब्रेकिंगच्या माध्यमातून केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!