महाविकास आघाडी सरकारने लोकशाहीची नितिमुल्ल पायदळी तुडवल्याबद्दल वेंगुर्ले भाजपा च्या वतीने निषेध……………हे तर पळपुटे सरकार – जिल्हा सरचिटणीस प्रसंन्ना देसाई
🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
_अचूक बातमी थेट हल्ला_
✍️ प्रतिनिधी :त्रिविक्रम सावंत
🎴वेंगुर्ले, दि६जुलै- :-भाजपाच्या निर्दोष १२ आमदारांचे एक वर्षासाठी निलंबन करून लोकशाहीची हत्या केल्याचा महाविकास आघाडी सरकारच्या कृतीचा निषेध करुन कार्यकर्त्यांच्या संतप्त भावना शासनापर्यत पोहचवण्यासाठी तहसीलदार प्रवीण कुमार लोकरे यांना निवेदन देण्यात आले .
शिवसेना – काँग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महावसुली आघाडी सरकारने तालीबानी पद्धतीने , लोकशाहीची नितिमुल्ल पायदळी तुडवत जनतेच्या कोणत्याही प्रश्नांना न्याय न देता भोंगळ पद्धतीने सरकारचा कारभार चालवत आहे . लोकशाहीत जनतेच्या मनातील राग व्यक्त करण्याचा अधिकार विरोधकांना असतो .परंतु लोकशाहीच्या संकेताचे पालनही या सरकारला करता आले नाही . सभागृहात जनतेच्या प्रश्नांना वाचा फुटू नये म्हणून निर्दोष १२ आमदारांचे निलंबन करून अशोभनीय कृतीचा आधार या पळपुट्या सरकारने घेतला आहे . जनतेचे कोणतेच सोयर सुतक नसलेल्या ठाकरे सरकारचा निषेध करत या भावना सरकारपर्यंत पोहचाव्यात अशी मागणी भाजपा वेंगुर्ले च्या वतीने करण्यात आली .
यावेळी जिल्हा सरचिटणीस प्रसंन्ना देसाई , तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर , महिला तालुका अध्यक्षा स्मिता दामले , ता.सरचिटणीस प्रशांत खानोलकर , मच्छिमार सेलचे जिल्हाध्यक्ष दादा केळुसकर , जिल्हा का.का.सदस्य बाळा सावंत , ता.उपाध्यक्ष मनवेल फर्नांडिस , ता.का.का.सदस्य रविंद्र शिरसाठ , किसान मोर्चा चे बाळु प्रभु , शक्ती केंद्र प्रमुख ज्ञानेश्वर केळजी व शामसुंदर मुननकर , युवा मोर्चा चे प्रणव वायंगणकर , मच्छिमार सेलचे ता.अध्यक्ष बाबा नाईक , महिला ता.सरचिटणीस व्रुंदा गवंडळकर , विशाल सावळ इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते .
*👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*
_*🏃♂️प्रवेश सुरू…प्रवेश सुरू…प्रवेश सुरू….🏃♂️*_
*_📚😍१०वी, १२वी, पदवीधर विद्यार्थी, नोकरदार, व्यावसायिक व महिलांसाठी शिक्षणातील सर्वोच्च संधी…😍_*
*● उपलब्ध शिक्षणक्रम:-*
*•बी.ए.*. *•बी.कॉम.*
*•एम.ए.* *•एम.कॉम.*
*•एम.बी.ए.* *•रूग्ण सहायक*
*🎓सिंधुदूर्ग जिल्ह्यातील विद्यापीठ मूल्यांकन ‘A श्रेणी’ प्राप्त अभ्यासकेंद्र*
*🎴प्रवेश अर्ज व माहितीसाठी संपर्क :-*
*यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ*
*डॉ. जे.बी.नाईक आर्टस् अँड कॉमर्स कॉलेज*
*आरपीडी ज्युनि. कॉलेज कॅम्पस, गेट नं. २ समोर,सावंतवाडी नगरपालिकेजवळ, सावंतवाडी.*
*मोबा. 8605992334*
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

