भाजप शहर अध्यक्षांनी ओबीसी आरक्षणासंदर्भात अभ्यास करुन बोलावे-अँड राघवेंद्र नार्वेकर

*💫सावंतवाडी दि.२८-:* ओबीसी समाजाला देण्यात आलेले नोकरी आणि शैक्षणिक आरक्षण हे घटनेत नमूद असून, ते फक्त केंद्र सरकारच्या अखत्यारीत येते. त्यामुळे भाजपच्या शहर अध्यक्षा सौ. मोहिनी मडगावकर यांनी ओबीसी आरक्षणाचा अभ्यास करूनच स्टेटमेंट द्यावे असा पलटवार कॉंग्रेस शहर अध्यक्ष अँड राघवेंद्र नार्वेकर यांनी केला आहे.

तसेच यावेळी ते म्हणाले की, काल केलेले आंदोलन हे केवळ स्टंटबाजी असून, कदाचित केंद्र सरकार विरोधातच भाजपने हे आंदोलन केले असल्याचा टोला त्यांनी लगावला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!