सिंधुदुर्ग जिल्हा मानद वन्यजीव रक्षक पदी आंबोली चे महादेव उर्फ काका भिसे यांची निवड
सिंधुदुर्ग जिल्हा मानद वन्यजीव रक्षक पदी आंबोली चे महादेव उर्फ काका भिसे यांची निवड
गेली वीस वर्षे अविरतपणे निसर्ग संवर्धनासाठी झटणारे आंबोली येथील महादेव उर्फ काका भिसे व प्राध्यापक नागेश दप्तरदार यांची सिंधुदुर्ग मानद वन्यजीव रक्षक या पदावर नियुक्ती झाली आहे मानद वन्यजीव रक्षक हे पद वनखात्याच्या अखत्यारित येत अतिशय मानाच समजल जाणारया पदावर केवळ पर्यावरण निसर्ग रक्षण निसर्ग अभ्यास किंवा निसर्गासाठी झटणाऱ्या लोकांची निवड केली जाते यासाठी मुख्य वनसंरक्षक कोल्हापूर यांच्या मार्फत मुलाखत घेऊन उमेदवारांची चाचणी केली जाते त्यांच्या निसर्गातील कामाविषयी माहिती घेऊन ही निवड केली जाते आंबोलीतील काका भिसे हे गेली वीस वर्ष निसर्ग संवर्धनासाठी जनजागृती साठी अविरतपणे झटत असून त्यांनी आतापर्यंत जंगल वनउपयोगी कामे केलेली आहेत वनखात्या सोबत सहकार्याने काम करत असताना त्याने अनेकदा अनाधिकृत बांधकाम अवैध वृक्षतोड शिकारीचे प्रकार उघडकीस आणून दिलेले आहे त्यांच्या या वीस वर्षाच्या कारकीर्दीत केलेल्या कामाची दखल वनविभागाने घेत त्यांची निवड सिंधुदुर्ग मानद वन्यजीव रक्षक या पदी केली आहे या पदावर कार्यरत असताना वनाशी संबंधित गुन्हे असतील अतिक्रमण असतील विविध वन उपयोगी उपक्रम असतील यासाठी काका भिसे यांच्याकडे वन खात्याचे अधिकृत ओळखपत्र असणार असून संपूर्ण जिल्हा हे त्यांचे कार्यक्षेत्र असणार आहे काका भिसे यांच्या निवडीमुळे निसर्गप्रेमी तसेच ग्रामस्थांकडून त्यांचे कौतुक होत आहे