🛑 शिरोडा येथे घरा घरात फिरून करण्यात आले १५४ व्यक्तींचे RTPCR टेस्ट..
🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
अचूक बातमी थेट हल्ला
✍️ प्रतिनिधी : समीर चव्हण
🎴वेंगुर्ले, दि-२७ :- तहसीलदार यांचे आदेशानुसार शिरोडा ग्रामपंचायत, ग्राम कृती समिती , प्राथमिक आरोग्य केंद्र रेडी व उपकेंद्र विभाग यांच्या वतीने तसेच शिरोडा सरपंच मनोज उगवेकर व आरोग्य विभाग अधिकारी डॉ नवार मॅडम , डॉ शुक्ला मॅडम यांनी केलेल्या नियोजना नुसार आज शिरोडा येथील शेट्येडोंगरी , गांधीनगर , राऊतवाडी , बागायतवाडी अशा वेगवेगळ्या ठिकाणी वाडीवार जाऊन घरा घरात फिरून १५४ व्यक्तींचे RTPCR टेस्ट करण्यात आले. यासाठी रेडी PHC अंतर्गत डॉक्टर, आरोग्य अधिकारी , आरोग्य सेवक,आशा कर्मचारी , ग्रामपंचायत सदस्य कौशिक परब , मयुरी राऊळ , वेदिका शेट्ये , ग्रा पं कर्मचारी तसेच पोलीस कर्मचारी यांच्या सह स्थानिक ग्रामस्थांचे ही सहकार्य मोठ्या प्रमाणात लाभले.
सम्पूर्ण दिवस मेहनत घेऊन पूर्ण टीम ने केलेल्या कार्याचे सरपंच मनोज उगवेकर यांनी कौतुक केले असून उपक्रमास मार्गदर्शन केल्या बद्दल तालुका आरोग्य अधिकारी डॉ माईणकर व सहकार्य केल्या बद्दल आरोग्य विभाग अधिकारी यांचे आभार मानले . या प्रसंगी
शिरोडा गाव कोरोनामुक्त करण्यासाठी सर्व नागरिकांनी कुठची ही भीती न बाळगता तसेच अफवाना बळी न पडता शासन नियमांचे पालन करून आरोग्य विभाग अधिकारी व कर्मचारी याना योग्य सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

