🛑 सुखाई महिला मंडळकडून खेर्डी विलगीकरण कक्षास मोफत जेवण..
🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
अचूक बातमी थेट हल्ला
✍️ प्रतिनिधी : संतोष पिलके
🎴चिपळूण, दि-२१ :- खेर्डी येथील सुखाई महिला मंडळ खतातेवाडी यांस कडून खेर्डी येथील विलगीकरण कक्षाला मोफत जेवण वाटप करण्यात आले. यावेळी माजी सरपंच सौ जयश्रीताई खताते, सरपंच वृंदा दाते, उपसरपंच विजय शिर्के, ग्रामपंचायत सदस्य अभिजीत खताते, सुप्रिया उतेकर,अश्विनी पंडित, अपर्णा दाते, ग्रा प कर्मचारी योगेश शिगवण, जितू मिरगळ, माजी ग्रामपंचायत सदस्य शांती कुंभार, अनिता दाभोळकर, गीता दाभोळकर, सिद्धी खताते आदी उपस्थित होते
सदर मंडळाकडून आठवडाभर हा उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे अभिजित खताते यांनी सांगितले.याबद्दल या मंडळाचे आभार व्यक्त करण्यात आले आहेत.

