आनंदी आयुष्यासाठी योगा करा, प्राणायम हिच आयुष्याची गुरूकिल्ली – माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत
🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्युज
अचुक बातमी थेट हल्ला
✍️प्रतिनिधी : सुनील आचरेकर
🎴सिंधुदुर्गनगरी : दि. २२ (ओरोस) जिल्हा कृषी प्रतिष्ठानद्वारे ७ वा जागतीक योगा दिन छत्रपती शिवाजी कृषी महाविद्यालय किर्लोस, ओरोस येथे साजरा करण्यात आला. यावेळी कृषी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष, मा. खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी योगा शिबीरात सहभाग घेऊन शिबीरार्थींना मार्गदर्शन केले. मानसाने आपल्या सुखी व आनंदी जीवनासाठी योगाला प्राधान्य दिले पाहिजे. योगा ही आपल्या देशाची संस्कृती आहे. कृषी प्रतिष्ठानच्या समृध्द गाव प्रकल्पाद्वारे योगा चळवळ गावागावात पोहचविणार असे ते म्हणाले.
कोविडशी लढा दयावयाचा असेल तर नित्यनेमाने प्राणायम करा. कोरोना निर्मुलनासाठी योगा हा एक उत्कृष्ठ पर्याय आहे. स्वतःच्या दिनक्रमात दररोज ७०० कपालभाती व ५०अनुलोम विलोम करून आनंदी जीवनाची गुरूकिल्ली म्हणजे प्राणायम असे मा. खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत म्हणाले. लवकरच जिल्हयामध्ये योगा सेंटर सुरू करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. योगा केल्याने मानसाची शक्ती, लवचिकता व स्टॅमिना वाढतो म्हणून योगा चळवळीत सर्वांनी सामिल होण्याचे आवाहन ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी केले.
कृषी प्रतिष्ठानचे तज्ञ योगा प्रशिक्षक प्राचार्य आनंद सावंत यानी सर्व प्रशिक्षनार्थींना मार्गदर्शन करून योगा प्रात्यक्षिके दाखवून सराव करून घेतला. विविध प्राणायमाचे प्रकार दाखवून सराव केला. शिबीराला सामाज सेविका अर्चना पटेल उपस्थित होत्या. तसेच कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख भास्कर काजरेकर, छत्रपती शिवाजी कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य आशिष पाटिल, तसेच कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ, कर्मचारी, कृषी महाविद्यालयाचे प्राध्यापक, कर्मचारी मिळून ४० प्रशिक्षणार्थींनी या शिबीराचा लाभ घेतला.

