हेदुळ येथे विलिगिकरण कक्ष सुरू…
🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्युज
अचुक बातमी थेट हल्ला
✍️प्रतिनिधी : सुनील आचरेकर
🎴सिंधुदुर्ग : दि. २० मालवण तालुक्यातील हेदुळ ग्रामपंचायत मर्यादित विलगीकरण कक्षाचे उद्घाटन हेदूळ सरपंच नंदू गावडे यांच्या हस्ते फित कापून, प्रकाश पुजारे यांच्या हस्ते विलगीकरण कक्षाचा शुभारंभ करण्यात आला.
त्यानंतर श्री. देवी माऊली सेवा मंडळाचे मुंबई अध्यक्ष वैभव जाधव यांनी आपल्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त कोविड विलगीकरण कक्षाला कोविड संबंधित औषधे स्टीमर दिली. तर विलगीकरण कक्षाला एस पी सामंत ५ बेड साईनाथ म्हादळकर यांनी दोन टेबल फॅन दिले.
तर विलगीकरण कक्षामध्ये दाखल होणाऱ्या व्यक्तीस रुग्णवाहिकेची अत्यावश्यक भासलेस नागेश ओरोसकर यांच्या मार्फत सेवा देण्यात येणार आहे.
यावेळी सरपंच नंददीपक गावडे, उपसरपंच दर्शाना पुजारे, अजगणी सरपंच हेमंत पारकर, ओवळीये सरपंच संबाजी सावंत, पोलीस पाटील रविकिरण सावंत, ग्रामसेवक एस. एम पिळणकर, श्री. देवी माऊली सेवा मंडळ अध्यक्ष वैभव जाधव, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष भिकाजी पुजारे, डॉ. हरमलकर आदी उपस्थित होते.

