🛑 इतर अत्यावश्यक दुकाना प्रमाणे सुवर्ण दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात यावी ; मोहिनी मडगावकर
🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
अचूक बातमी थेट हल्ला
✍️ प्रतिनिधी : प्रथमेश गावडे
🎴सावंतवाडी, दि-१८ -: इतर अत्यावश्यक दुकाना प्रमाणे सुवर्ण दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात यावी अशी मागणी दैवज्ञ ( सोनार) महिला मंडळ अध्यक्षा तथा भाजप महिला शहर अध्यक्षा मोहिनी मडगावकर यांनी सुवर्णकार समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.
यावेळी त्या म्हणाल्या की, इतर आवश्यक दुकाना प्रमाणे सुवर्ण दुकानात गर्दी होत नाही. परंतु, तरीही गेले अडीच महिने जिल्ह्यातील सुवर्णकारांची दुकाने बंद आहेत. त्याचाच परिणाम सोन्याचे दागिने घडवणाऱ्या आणि मजुरीवर काम करणाऱ्या सोनारांची अवस्था वाईट झाली आहे. त्यांना उदरनिर्वाह करण्यासाठी काही साधन नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे कोरोनाचे नियम पाळून सुवर्ण दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात यावी अशी मागणी मोहिनी मडगावकर यांनी केली आहे.

