🛑 बडे नेते सांगताहेत या काळात राजकारण करू नये ; परंतु सावंतवाडीत मात्र शिवसेना भाजपात डबलबारी कायमच सुरु..
🛑 राजकारण थांबवून दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी जनतेचा विचार करावा ; मनसे शहर अध्यक्ष आशिष सुभेदार
🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
अचूक बातमी थेट हल्ला
✍️ प्रतिनिधी : प्रशांत मोरजकर
🎴सावंतवाडी, दि-१६ :- सध्या सर्वत्रच कोरोनाने थैमान घातले आहे. त्यामुळे जास्तित जास्त कोरोनाला कसा आळा घालता येईल यासाठी सर्व ठिकाणी प्रयत्न सुरु आहेत.
तसेच सत्ताधारी, विरोधकांमधील सर्व मोठे नेते या कोरोना काळात राजकारण न करण्याचे आवाहन करत आहेत. मात्र सावंतवाडी शहरात शिवसेना भाजपात मोठ्या प्रमाणावर डबलबारी सुरु आहे. अशी एकमेकांवर टिका टिपणी करून डबलबारी करण्यापेक्षा. सर्वांनी एकत्र येवून आरोग्य व्यवस्था बळकट व कोरोनाचा प्रसार कसा कमी करता येईल याकडे लक्ष द्यावा असे मत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर अध्यक्ष आशिष सुभेदार यांनी दिला.

