आणखीकणकवलीकोकणशासकीयसिंधुदुर्ग

कणकवली बाजारपेठेतील अत्यावश्यक सेवे व्यतिरिक्त चालु असलेली विविध दुकाने पोलीस प्रशासन, न. पं. कडुन बंद करण्यात आली…

🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्युज

अचुक बातमी थेट हल्ला

✍️प्रतिनिधी : रविकांत जाधव

🎴 कणकवली : दि. १६ तालुक्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, आज सकाळी शहरातील बाजारपेठेतील अत्यावश्यक सेवे व्यतिरिक्त चालु असलेली विविध दुकाने पोलीस प्रशासन, तसेच न. पं. कडुन बंद करण्यात आली.

दरम्यान, पोलीस निरीक्षक अजीरुद्दीन मुल्ला यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी चौथ्या चरणातील प्राप्त GR नुसार कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी असलेल्या नियमांनुसार अत्यावश्यक सेवे व्यतिरिक्त जी दुकाने चालु होती, ती बंद करण्यात येत आहेत. अशी माहीती त्यांनी दिली.

तर सदर कारवाई बाजरपेठेत फेर फटका मारत पोलीस निरीक्षक अजीरुद्दीन मुल्ला यांच्या मार्गदर्शनाखाली पी. आय. सुरज पाटील, स. उप. फौ. विनायक चव्हाण, पो. हवालदार जाधव, वाहतुक पोलीस माने, न. पं. कर्मचारी रविंद्र महाड़ेश्वर, संतोष माने आदींनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!