🛑 विलगीकरण कक्षासाठी गावातील शिक्षकांकडून आर्थिक मदत सरपंच हेमंत मराठे यांच्याकडे सुपूर्त..
🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
अचूक बातमी थेट हल्ला
✍️ प्रतिनिधी : प्रशांत मोरजकर
🎴मळेवाड, दि-१५ :- गाव विलगीकरण कक्षासाठी गावातील शिक्षकांकडून आर्थिक मदत सरपंच हेमंत मराठे यांच्याकडे सुपूर्त करण्यात आली आहे.
शासनाने गृह विलगीकरण बंद करून स्थानिक पातळीवर ग्रामपंचायतीने गावातील शाळांमध्ये विलगीकरण कक्ष सुरु करण्याचे सूचना दिल्या होत्या. त्यानुसार ग्रामपंचायत मळेवाड कोंडूरेने राणी पार्वतीदेवी विद्यालय मळेवाड केंद्र शाळा नंबर 1 मध्ये गाव विलगीकरण कक्ष सुरू केला आहे.या कक्षासाठी गावातील सामाजिक कार्यकर्ते ग्रामस्थ व व्यापारी व दानशूर व्यक्ती यांनी आपापल्या परीने मदत केली आहे. या विलगीकरण कक्षासाठी मळेवाड कोंडूरे गावातील शाळांमधील शिक्षकांनी विलगीकरण कक्षासाठी आर्थिक मदत सरपंच हेमंत मराठे यांच्याकडे सुपूर्त केली आहे. शिक्षकांनी केलेल्या या मदतीबद्दल सरपंच मराठे यांनी सर्व शिक्षक वृंद यांचे आभार व धन्यवाद व्यक्त केले आहेत.

