कोकणदोडामार्गमहाराष्ट्रराजकीयसामाजिकसिंधुदुर्ग

🛑 सरकारी नोकर ,शासकीय माजी कर्मचारी,खासदार, आमदार यांनी आपल्या वेतनातून दहा टक्के रक्कम शासकीय तिजोरीत द्यावी ; मनसे उप तालुका अध्यक्ष संदिप गवस यांची मागणी..

 

🛑 त्यामुळे होणार देशाची आर्थिक घडी सुरळीत होण्यास मदत..

🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज

अचूक बातमी थेट हल्ला

✍️ प्रतिनिधी : प्रतिक राणे

🎴दोडामार्ग, दि-१५ :- देशात, राज्यात कोरोना महामारी मोठ्या प्रमाणात वाढत असून,प्रत्येक राज्यात टाळेबंदी असल्यामुळे संपूर्ण देशातील उद्योग धंदे पूर्ण पणे ठप्प झाले आहेत. लाखो लोकांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत. देशाची आर्थिक घडी पूर्णपणे ठप्प झाली आहे. त्यामुळे देशातील आर्थिक घडी सुरळीत होण्यासाठी सरकारी नोकर तसेच शासकीय माजी कर्मचारी तसेच खासदार, आमदार यांनी आपल्या वेतनातून दहा टक्के रक्कम शासकीय तिजोरीत द्यावी अशी मागणी मनसे उप तालुका अध्यक्ष संदिप गवस यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!