🛑 राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त पिंगुळीत मनसे तर्फे आशा सेविकांना स्टीमर मशीन भेट..
🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
अचूक बातमी थेट हल्ला
✍️ प्रतिनिधी : गणेश तोडकर
🎴कुडाळ, दि-१५ :- राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त पिंगुळी ग्रामपंचायत सदस्य व मनसे माजी तालुका अध्यक्ष श्री बाबल गावडे यांच्या सौजन्याने पिंगुळी गावातील आशा सेविकांना स्टीमर मशीन भेट देण्यात आल्या या वेळी मनसे उप तालुकाध्यक्ष श्री दीपक गावडे, ग्रामपंचायत सदस्य सौं. दिव्या गावडे विभाग अध्यक्ष श्री सुंदर गावडे, उप विभाग अध्यक्ष श्री विष्णू म्हस्के आदी मान्यवर उपस्थित होते, आशा सेविकांनी या बाबत आभार व्यक्त करतानाच श्री माननीय राज ठाकरे साहेबाना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि पुढील राजकीय वाटचालीस सुयश चिंतिले.

