आणखीमहाराष्ट्ररत्नागिरी

🛑 राजापूर शहर आणि आसपास गेले दोन दिवस सुरू असलेल्या पावसामुळे मौजे धोपेश्वर मधील गुजरआळी येथील दरड कोसळली..

 

🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज

अचूक बातमी थेट हल्ला

✍🏻 प्रतिनिधी : अद्वैत अभ्यंकर

🎴 राजापूर, दि-१४ :- गेले दोन दिवस राजापूर आणि आसपासच्या परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आज धोपेश्वर मधील गुजराळी येथील प्रसिध्द श्रीदेव गणपती आणि श्रीदेव लक्ष्मीनारायण मंदिर जवळील दरड कोसळली. सदर दरडीमुळे नागरिकांची वाट सुद्धा बंद झाली असून नजीकच्या घराला धोका उत्पन्न झाला आहे.

राजापूर शहराला लागून वाहणाऱ्या अर्जुना नदीच्या पातळीत कमालीची वाढ झाली आहे. त्यामुळे शहर बाजारपेठेतील व्यापारी सतर्क झाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!