🛑 वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कुसूर गावात जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी दिली भेट..
🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
अचूक बातमी थेट हल्ला
✍️ प्रतिनिधी : संजय शेळके
🎴वैभववाडी, दि-१२ :- वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कुसूर गावात जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी भेट दिली. वैभववाडी तालुक्यात कोरोनात कुसूर अग्रेसर आहे. या पार्श्वभूमीवर गावातील सुतारवाडी प्रशासनाने कंटेन्मेन झोन जाहीर केले आहे. सुतारवाडीच्या नजीकच्या वाड्या बाधित होऊ नये, यासाठी प्रशासन कार्यरत आहे.
राजेंद्र दाभाडे यांनी अधिकारी व ग्रामनियंत्रण समितीला यावेळी सुचना व मार्गदर्शन केले. तहसीलदार रामदास झळके, तालुका आरोग्य अधिकारी श्री. पवार व संनियंत्रण समिती कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रयत्न करत आहेत. शासनाच्या नियमाप्रमाणे कार्य करत आहे. याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
यावेळी तहसीलदार रामदास झळके, पो. निरिक्षक अतुल जाधव, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कांबळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अनिल पवार, पो. उपनिरीक्षक प्रवीण देसाई, सरपंच सौ. शिल्पा साळुंखे, पो.पाटील श्री साळुंखे, ग्रामसेवक शशिकांत गुरव, डॉ. पाटील, व संनियंत्रण समिती सदस्य उपस्थित होते.

