आणखीकोकणवेंगुर्लेसामाजिकसिंधुदुर्ग

भाजपकडुन परुळे पंचक्रोशीतील तौक्ते चक्रीवादळ नुकसानग्रस्तांना मदतीचा हात…

🛑 ताडपत्री, पत्रे, रोख रक्कम, पाण्याची टाकी व जीवनावश्यक वस्तु असे मदतीचे स्वरूप…

🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्युज

अचुक बातमी थेट हल्ला

✍️प्रतिनिधी : समीर चव्हाण

🎴परुळे (ता. वेंगुर्ले) : दि. ११ भाजपा सिंधुदुर्ग माजी आमदार राजन तेली यांच्या नेतृत्वाखाली भाजपा चिटणीस माजी सभापती निलेश सामंत यांच्या सौजन्याने तौक्ते वादळामुळे परुळे पंचक्रोशीत जे नुकसान झाले, त्या परिसरातील भोगवे शेळपी व किल्लेनिवती येथील नुकसान ग्रस्त गरीब कुटुंबाना आधार म्हणून ताडपत्री, पत्रे, रोख रक्कम पाण्याची टाकी, जीवनावश्यक वस्तूचे वाटप करण्यात आले.

यावेळी जिल्हाध्यक्ष माजी आमदार राजन तेली, तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, जिल्हा सरचिटणीस बाळू देसाई, मच्छिमार नेते वसंत तांडेल, तालुका सरचिटणीस बाबली वायंगणकर, कुशेवाडा उपसरपंच निलेश सामंत, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष प्रसाद पाटकर, भोगवे सरपंच रुपेश मुंडये, माजी चेअरमन प्रकाश राणे, शक्ती केंद्र प्रमुख रुपेश राणे, ग्रामपंचायत सदस्य संतोष करलकर, कोळंबकर बूथ प्रमुख सिद्धेश वायंगणकर, मालंडकर आदिंसह ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!