आणखीकोकणदोडामार्गमहाराष्ट्रशासकीयसामाजिकसिंधुदुर्ग

🛑 महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे तिलारी ते विजघर परिसर काळोखात..

 

🛑 लवकरात लवकर विद्युत लाइनची दुरुस्ती पूर्ण न केल्यास महावितरणाच्या कार्यालयास घेरावा घालू ; सामाजिक कार्यकर्ते दत्ताराम देसाई

🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज

अचूक बातमी थेट हल्ला

✍️ प्रतिनिधी : प्रतिक राणे

🎴दोडामार्ग, दि-०७ :- महावितरणाच्या भोंगळ कारभारामुळे कोनाळ तिलारीवाडी येथे जीर्ण झालेले ११ केवी लाइन चे पाच विद्युत पोल जमिनीवर पडले आहेत. त्यामुळे पुढील सोनावल, पाळये, केंद्रे ,बाबरवाडी, बांबार्डे, घाटीवडे, मुळस या परीसरात आज दुपार पासून लाईट नाही आहे.

महावितरणच्या या निष्काळजी पणा मूळे या परीसरातील लोकांना काळोखात राहावे लागले आहे. वेळीच या लाइनची दुरुस्ती केली असती तर ही वेळ आली नसती.

लाईट ची बिल मात्र वेळीच्या वेळी भरावी लागतात. त्यामुळे लवकरात लवकर या विद्युत लाइनची दुरुस्ती पूर्ण न केल्यास गावातील ग्रामस्थांना घेवून महावितरणाच्या कार्यालयास घेरावा घालू असे सामाजिक कार्यकर्ते दत्ताराम देसाई यांनी सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!