आरोग्यकोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑 मळेवाड कोंडूरे गावात लसीकरणाला चांगला प्रतिसाद..

 

*🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज*

_अचूक बातमी थेट हल्ला_

*✍️ प्रतिनिधी : प्रशांत मोरजकर*

*🎴मळेवाड, दि-०७ :-* मळेवाड कोंडूरे गावात लसीकरणाला चांगला प्रतिसाद मिळत असून 45 वर्षावरील सर्वांना लस देण्यासाठी ग्रामपंचायत व आरोग्य प्रशासन प्रयत्न करत आहे.

मळेवाड कोंडूरे गावातील 45 वर्षावरील ग्रामस्थांना लसीकरण मळेवाड प्राथमिक आरोग्य केंद्रात करण्यात येत होते. मात्र या ठिकाणी इतर गावातील लोक लसीकरणासाठी येत असल्याने गावातील लोकांना वेळेत लस मिळत नव्हती.तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोनाची टेस्ट केली जात असल्याने ती टेस्ट करण्यासाठी इतर गावातून ग्रामस्थ या ठिकाणी येत असल्याने मळेवाड कोंडूरे गावातील लोकांना कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याचा धोका होता.या दोन्ही गोष्टींचा विचार करून ग्रामपंचायतीने मळेवाड कोंडूरे गावातील ग्रामस्थांना स्वतंत्र लस द्यावी असे निवेदन देऊन मागणी केली होती. त्या मागणीचा वैद्यकीय अधिकारी यांनी मागणी मान्य केल्याने लसीकरण हे गावातील ग्रामस्थांसाठी वेगळ्या ठिकाणी कसे करता येईल यासाठी नियोजन सुरू करण्यात आले. या लसीकरणासाठी मळेवाड हेदुलवाडी येथील श्री गजानन महाराज सेवा मंडळा च्या कार्यकारी मंडळाने मंदिराच्या सभागृह उपलब्ध करून दिला. यामुळें गावातील 110 ग्रामस्थानी लसीकरण करून घेतले. गावांसाठी स्वतंत्र लसीकरण केंद्र सुरू केल्याने ग्रामस्थानी सरपंच हेमंत मराठे व ग्रामपंचायत प्रशासनाने आभार मानले. यापुढील येणारी लस ही याच ठिकाणी देण्यात येणारं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!