आणखीकणकवलीकोकणशासकीयसिंधुदुर्ग

कणकवली तालुक्यातील एस‌. टी. सेवा हि ५० % आसन क्षमतेने प्रवासी वाहतुक सुरू

🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्युज

अचुक बातमी थेट हल्ला

 ✍️प्रतिनिधी : रविकांत जाधव

 🎴कणकवली : दि. ०७ लॉकडॉनमध्ये आजपासुन शिथिलता करण्यात आल्याने कणकवली तालुक्यातील एस‌.टी. सेवा हि ५० % आसन क्षमतेने प्रवासी वाहतुक सुरू करण्यात आली आहे. म्हणजेच ५० सीटच्या एस.टी.त २५ प्रवाशी मिळताच गावाकडे एस.टी. जाणार आहे.

प्रवाशांनीही एस.टी. प्रवास करताना आपल्या तोंडावर मास्क वापरणे आणि सामासिक अंतर ठेवणे गरजेचे असल्याचे एस‌.टी. प्रशासनाकडुन सांगण्यात येत आहे.

आज कणकवली बस स्थानकातुन आचरा, कळसुली, नरडवे, घोडगे, फोंडा, खारेपाटण, वैभववाडी, मौदे, सावंतवाडी अशा काही एस.टी. फेऱ्या आजपासुन सुरू करण्यात आल्या आहेत. याचे वेळापत्रक हि लावण्यात आले असुन, जस – जसे प्रवासी उपलब्ध होतील. तस – तशा एस. टी. फेर्‍या वाढविण्यात येतील, अशी माहिती सिंधुदुर्ग विभाग नियंत्रक रसाळ यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!