सिंधुदुर्ग जि. प.च्या अध्यक्षा संजना संदेश सावंत यांनी विशेष बाब म्हणुन जिल्ह्यातील १८ ते ४४ वयोगटातील पत्रकारांना फ्रंटलाइन वर्कर म्हणुन लसीकरणाचा लाभ
🛑कणकवली कॉलेज येथे लसीकरण केंद्राचा शुभारंभ, सर्व पत्रकार बांधवांनी त्यांचे विशेष आभार मानले…
🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्युज
अचुक बातमी थेट हल्ला
✍️प्रतिनिधी : रविकांत जाधव
🎴कणकवली : दि. ०२ एकीकडे राज्यभर पत्रकार बांधवाना फ्रंटलाइन वर्कर म्हणुन लस देण्यात यावी, अशी मागणी जोरधरत असतानाच शासन स्तरावर मात्र या मागणीकडे लक्ष दिले जात नव्हते. परंतु सिंधुदुर्ग जि. प.च्या अध्यक्षा संजना संदेश सावंत यांनी विशेष बाब म्हणुन जिल्ह्यातील १८ ते ४४ वयोगटातील पत्रकारांना फ्रंटलाइन वर्कर म्हणुन लसीकरणाचा लाभ दिला आहे.
याबद्दल त्यांचे पत्रकार बांधवांनी त्यांचे विशेष आभार मानले. प्रायोगीक तत्त्वावर कणकवली कॉलेज येथील लसीकरण केंद्रावर या लसीकरण मोहिमेचा शुभारंभ जि.प. अध्यक्षांनी केला. यावेळी कणकवली न.पं.चे नगराध्यक्ष समीर नलावडे, भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, गटनेते संजय कामतेकर, पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष चंद्रशेखर देसाई, आरोग्य अधिकारी प्रशांत बुचडे, तसेच आरोग्य कर्मचारी, पत्रकार संजय बाणे, रोशन तांबे अनिकेत उचले, दिपा राणे, उल्का तावडे, ओंकार ढवण, स्वप्निल वरवडेकर आदी पत्रकार बांधव उपस्थित होते.
कणकवली कॉलेजमधील लसीकरण केंद्रातील शुभारंभानंतर प. स. दालनात जि.प.अध्यक्षा संजना सावंत यांनी पत्रकारांशी संवाद साधला यावेळी त्या म्हणाल्या, पत्रकारांना फ्रंटलाइन वर्कर म्हणुन सर्वांत प्रथम सिंधुदुर्गात लसीकरण होत आहे. याचे श्रेय महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना जाते. पत्रकार हे फ्रंटलाईनवर राहुन काम करत असतात. त्यामुळे पत्रकरांना फ्रंटलाईन वर्कर म्हणुन लस देण्यात यावी, असा निर्णय टासफोर्सच्या बैठकित घेण्यात आली. त्याची अंमलबजावणी म्हणुन कणकवलीत याचा शुभारंभ करण्यात आला असुन, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १८ ते ४४ वयोगटातील पत्रकारांना लसीकरण करण्यात येणार असुन, याबाबतची यादी आपल्याकडे द्यावी, असे त्यांनी सांगितले.
यावेळी सभापती मनोज रावराणे, उपसभापती प्रकाश पारकर, गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, प.स.सदस्य मिलिंद मेस्त्री, पिसेकामते सरपंच सुहास राणे आदी उपस्थित होते.

