विनाकारण फिरणाऱ्यांना सावंतवाडी पोलिसांचा दणका
विनाकारण सावंतवाडी बाजारपेठेत फिरणाऱ्या नागरिकांना सावंतवाडी पोलिसांनी जोरदार दणका दिला.
प्रत्येक वाहनाला थांबवून त्याला बाजारात येण्याची कारणे विचारून ,त्याच्याकडील वाहनचालविण्याचा परवाना तपासून ही कारवाई करण्यात आली,त्यामुळे दुपारी अकरानंतर बाजारपेठेतील गर्दी ओसरली.सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोना रुग्ण झपाट्याने वाढत असल्यामुळे जिल्हा पोलीस प्रशासनाला हा निर्णय घ्यावा लागला आहे, यापुढे अधिक कडक कारवाई करण्यात येईल असे पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आले, आज दुपारी बारा वाजेपर्यंत सुमारे ५० वाहनधारकांवर कारवाई करण्यात आली.

