दिनेश रावराणे व नावळे गावचे ग्रामसेवक ए .एस.घुगे यांनी केले गावातील निराधार व गरजू व्यक्तींना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप..
_*🛑 दिनेश रावराणे व नावळे गावचे ग्रामसेवक ए .एस.घुगे यांनी केले गावातील निराधार व गरजू व्यक्तींना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप..*_
*🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज*
_अचूक बातमी थेट हल्ला_
*✍️ प्रतिनिधी : संजय शेळके*
*🎴वैभववाडी, दि-३१ :-* नावळे गावचे सुपुत्र दिनेश भास्कर रावराणे व नावळे गावचे ग्रामसेवक ए एस घुगे या दोघांनी स्वखर्चातून संयुक्तपणे नावळे गावातील निराधार व गरजू व्यक्तींना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले.
या वस्तूंमध्ये साखर, चहा पावडर, तेल, मीठ, तूरडाळ, जिरे, हळद ,कांदे, बटाटे, कपड्याची साबण व डेटॉल साबण ई. वस्तूंचे वस्तू स्वरूपात जीवनावश्यक वस्तूंचे गावातील दहा कुटुंबाना वाटप करण्यात आले.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य श्री. महेश परशुराम रावराणे, पत्रकार संजय मारुती शेळके, कृषी सहाय्यक दीपक मसेकर , ग्रा.पं. कर्मचारी जगन्नाथ गणपत गुरव, प्राची प्रकाश रावराणे , ग्रामस्थ पांडुरंग भाई रावराणे व मधुकर सुर्वे इत्यादी उपस्थित होते.