स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने गोवा बनावटीची ४० लाख रुपये किंमतीची दारू पकडली
🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्युज
अचुक बातमी थेट हल्ला
✍️प्रतिनिधी : रविकांत जाधव
🎴कणकवली : दि. ३१ स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने महामार्गावर गोवा बनावटीच्या तब्बल ४० लाख रुपये किंमतीची दारूसह टेम्पो मिळुन ५५ लाखांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. गोव्याहुन नाशिककडे जाणारा टेम्पो, या पथकाने तळेरे येथे पहाटे ३.१५ च्या सुमारास ताब्यात घेतला. याप्रकरणी चालकासह दोघा जणांना अटक करण्यात आली आहे.
स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाला मिळालेल्या माहितीनुसार, पथकाने तळेरे येथे नाशिककडे जाणारा आयशर टेम्पो (GJ.24. X. 0911) च्या हौद्यात गोवा बनावटीच्या दारूचे ३५७ बॉक्स सापडले. याची किंमत चाळीस लाख २५ हजार ८८० रुपये असुन, एकुण ५५ लाख ५ हजार ८८० रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला.
हि कारवाई पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे, अप्पर पोलीस अधीक्षक तुषार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा अन्वेषण पोलीस निरीक्षक सुनील धनावडे, उपनिरीक्षक सचिन शेळके, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आर. बी. शेळके, हवालदार प्रकाश कदम, गुरुनाथ कोयंडे, कृष्णा केसरकर, प्रमोद काळसेकर, ज्ञानेश्वर कांदळगावकर, रवी इंगळे, संकेत खाड्ये, प्रथमेश गावडे, चंद्रकांत पालकर यांच्या पथकाने केली.

