आणखीकणकवलीकोकणसामाजिकसिंधुदुर्ग

स्व. विजयराव नाईक यांचा सहावा स्मृतिदिन शिरवल विजयराव नाईक फार्मसी कॉलेज येथे विजयभाऊंच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून साजरा

🎥कोकण लाईव्ह ब्रेकींग न्युज

अचुक बातमी थेट हल्ला

✍️प्रतिनिधी : रविकांत जाधव

🎴कणकवली : दि. ३० सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जडणघडणीत राजकीय, सामाजिक, शैक्षणिक अशा विविध क्षेत्रात महत्वपुर्ण योगदान देणारे स्व. विजयराव नाईक यांचा सहावा स्मृतिदिन शिरवल विजयराव नाईक फार्मसी कॉलेज येथे विजयभाऊंच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून साजरा करण्यात आला. यावेळी त्यांच्या आठवणींना उजाळा देत अभिवादन करण्यात आले.

स्मृतिदिनानिमित्त विजयराव नाईक फार्मसी कॉलेजच्या कोविड केअर सेंटरमध्ये रुग्णांना बिस्कीट, प्रोटीनयुक्त खाद्य वस्तु, कोविड सेंटरसाठी पीपीई किट, फेसशिल्ड या वस्तुंचे वाटप शिवसेना नेते संदेश पारकर यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच कणकवली विजयभवन कार्यालय येथे त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहिण्यात आली.

याप्रसंगी आमदार वैभव नाईक, शिवसेना नेते संदेश पारकर, राजु राणे, सतीश नाईक, नगरसेवक सुशांत नाईक, संकेत नाईक, राजु राठोड, भास्कर राणे, रूपेश आमडोस्कर, भुषण परुळेकर, निसार शेख, महेश देसाई, अनिल नाईक, गणेश राणे, फार्मसी कॉलेजचे रमण बाणे, मंदार सावंत आदींसह कोविड सेंटरचे वैद्यकीय अधिकारी स्टाफ नर्स उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!