आणखीकणकवलीकोकणराजकीयसिंधुदुर्ग

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ३० मे रोजी ७ वर्षे यशस्वी कार्यकाल पुर्ण केल्याबद्दल भाजपकडुन विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले…

🎥कोकण लाईव्ह ब्रेकींग न्युज

अचुक बातमी थेट हल्ला

✍️प्रतिनिधी : रविकांत जाधव

🎴कणकवली : दि. ३० पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ३० मे रोजी आपला पंतप्रधान म्हणुन ७ वर्षे यशस्वी कार्यकाल पुर्ण केला. त्यानिमीत्त भाजपाच्या वतीने सेवा सप्ताहाचा कार्यक्रम होत असुन, कणकवली तालुका भाजपच्या वतीने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता उपजजिल्हा रुग्णालय कणकवली येथील परिसर सॅनिटायज केला.

तसेच शहरात कोरोना काळात कोविड योद्धा म्हणुन सेवा देणारे पोलीस तथा रॅपिड तपासणी करणारे कर्मचाऱ्यांना मास्क, सॅनिटायझर वाटपही करण्यात आले.

यावेळी जि. प. अध्यक्षा संजना सावंत, नगराध्यक्ष समीर नलावडे, तालुका अध्यक्ष मिलिंद मेस्त्री, सभापती मनोज रावराणे, नगरसेविका मेघा गांगण, युवा मोर्चा सरचिटणीस संदीप मेस्त्री, नगरसेवक शिशीर परुळेकर, पं. स सदस्य महेश लाड, नगरसेवक विराज भोसले, युवा मोर्चा जिल्हा चिटणीस पपू पुजारे, युवा मोर्चा अध्यक्ष गणेश तळगावकर, सर्वेश दळवी, विजय इंगळे, सचिन पराधिये, समर्थ राणे, अजय घाडीगांवकर, बाळा पाटील उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!