पोलिसांना जाब विचारत, हुज्जत घातल्या प्रकरणी एकाला कणकवली पोलिसांनी घेतले ताब्यात
🛑 आरोग्य पथक, महिला कर्मचारी यांच्या अंगावर जाण्याचा प्रयत्न
🛑 दारू पिऊन धिंगाणा घालणे पडले महागात
🛑 विविध कलमानुसार गुन्हा दाखल
🎥कोकण लाईव्ह ब्रेकींग न्युज
अचुक बातमी थेट हल्ला
✍️प्रतिनिधी : रविकांत जाधव
🎴कणकवली : दि. २९ शहरात विनाकारण – विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांनवर पोलिसांची कडक कारवाई सुरू आहे. आज सकाळच्या सत्रात पटवर्धन चौकात पोलिसांना जाब विचारत, हुज्जत घातल्या प्रकरणी एकाला कणकवली पोलिसांनी ताब्यात घेत पोलीस स्थानकात नेले. ही व्यक्ती आरोग्य पथक यांच्यासोबत देखील भांडणं करत होती. महिला कर्मचारी यांच्या अंगावर जाण्याचा प्रयत्न करीत होती. दारू पिऊन धिंगाणा घालण्याचा प्रयत्न केला, म्हणुन विविध कलमानुसार त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अत्यावश्यकमध्ये येत असणाऱ्या दुकानांनी ही नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई होणार आहे. कणकवली नगरपंचायत आणि पोलीस प्रशासनाकडुन स्वतः कणकवली मुख्याधिकारी अवधुत तावडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर खंडागळे हे चौकाचौकात गस्त घालत आहेत.
यामुळेच आता नागरिक कमी फिरताना आढळुन आले आहेत. नियम पाळा आणि व्यापार करा, अनावश्यक गर्दी टाळा. पोलिस प्रशासन, नगरपंचायत कर्माचारी, आरोग्य पथक यांना सहकार्य करा. असे आव्हाहन पोलिस अधिकारी, नगरपंचायत कर्मचारी, मुख्याधिकारी, प्रांताधिकारी, आरोग्य पथक करतं आहे.

