रत्नागिरीसामाजिक

रत्नागिरी जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू; जिल्हाधिकाऱ्यांकडून आदेश जारी..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : संतोष पिलके

🎴रत्नागिरी,दि.०८: कोरोना विषाणू साथीच्या वाढत्या प्रादुर्भावासाठी खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनि जमावबंदी आदेश जारी केले आहेत. ६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वा. पासून हे आदेश लागू झाले आहेत. दोन महिन्यापेक्षा कमी किंवा पुढील आदेश होइपर्यंत लागू रहाणार आहेत. कोरोना विषाणू प्रादुर्भाव आपत्ती व्यवस्थापन अधिनियम-२००५,भारतीय साथ रोग नियंत्रण-१८९७,महाराष्ट्र कोव्हिड-१९,उपाययोजना नियम २०२० ची अंमलबजावणी करण्यासाठी फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ नुसार ५ किंवा ५ पेक्षा अधिक व्यक्तींना सार्वजनिक ठिकाणी एकत्रित येण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. प्रभारी जिल्हाधिकारी तथा दंडाधिकारी दत्ता भडकवाड यांनी हे आदेश ६ ऑक्टोबर रोजी निर्गमित केले आहेत.
जिल्ह्यात प्रतिबंधित असलेल्या बाबी
जिल्ह्यातील शाळा,कॉलेज, प्रशिक्षण संस्था,शिकवणी देणाऱ्या संस्था ३१ ऑक्टोबर पर्यंत बंद राहतील. चित्रपट गृहे, जलतरण तलाव,मनोरंजन पार्क,नाट्यगृह, मॉल, मार्केट कॉम्प्लेक्स सह, ऑडीटोरियम यासारखी तत्सम ठिकाणे बंद रहातील. सर्व सामाजिक, राजकिय,धार्मिक कार्य,करमणूक,शैक्षणिक,संस्कृतिक,इतर मेळावे,धार्मिक सभा/ परिषदांना यांना बंदी असेल असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

कोव्हिड-19 च्या प्रतिबंधासाठी उपाययोजना
(कोव्हिड-19 च्या व्यवस्थापनाबाबतचे राष्ट्रीय निर्देश)

1. सार्वजनिक ठिकाणी, कामाच्या ठिकाणी आणि प्रवास करतेवेळीमास्क, चेहरा झाकावयाचे साधन वापरणे बंधनकारक राहील.

2. सर्व सार्वजनिक ठिकाणी तसेच वाहतुकीदरम्यान सर्व नागरिकांनी सामाजिक अंतराचा निकष पाळणे बंधनकारक असेल.
दुकानामध्ये / दुकान परिसरामध्ये 5 पेक्षा जास्त व्यक्ती / ग्राहक यांना गर्दी करणेस प्रतिबंध असेल. तसेच उपस्थित असलेल्या
व्यक्ती / ग्राहकांमध्ये 6 फुटापेक्षा जास्त अंतर राखणे बंधनकारक राहील.

3. मोठे सार्वजनिक मेळावे / कार्यक्रमयांना प्रतिबंध राहील.
* विवाह संबंधीत कार्यक्रमासाठी जास्तीत जास्त 50 च्या मर्यादेत नातेवाईक / व्यक्तींना उपस्थित राहता
येईल.
* अंत्यविधी / अंत्ययात्रेच्यावेळी जास्तीत जास्त 20 च्या मर्यादेत व्यक्तींना उपस्थितराहता येईल

4. सार्वजनिक ठिकाणी तसेच कामाच्या ठिकाणी थुंकणे हे दंडनिय असेल व त्यासाठी संबंधीत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या
कायद्यानुसार दंडात्मक कारवाई केली जाईल.
5.सार्वजनिक ठिकाणी दारु, पान, तंबाखूजन्य पदार्थ खाण्यास व थुंकण्यास प्रतिबंध राहील.

कामाच्या ठिकाणांबाबतचे अतिरिक्त निर्देश

6. घरातून काम (Work From Home) – जेथे शक्य असेल तेथे घरी राहून काम करण्याचा अवलंब करावा. कामाची ठिकाणे, कार्यालये, दुकाने, बाजारपेठ आणि औद्योगिक व व्यावसायिक आस्थापनांमध्ये कामाच्या वेळात योग्य ते अंतर ठेवावेजेणेकरुन गर्दी होणार नाही.

7. कार्यालये/ आस्थापनामधील सर्व प्रवेश व बाहेर पडणेच्या ठिकाणी तसेच कार्यालयातील सार्वजनिक ठिकाणी थर्मल स्कॅनिंग /हँड वॉश / सॅनिटायझर हे उपलब्ध करुन घ्यावे.

8. कामाच्या ठिकाणाचे सार्वजनिक सुविधांचे आणि मानवी संपर्कात येणारी सर्व ठिकाणी जसे की, दरवाजाचे हँडल आदींचे दोन पाळयादरम्यान तसेच वारंवार निर्जंतूकीकरण करणे बंधनकारक राहील. कामगारांना सतत हात धुणे बंधनकारक राहील.

9. कामाच्या ठिकाणी सर्व नागरिकांनी कामगारामधील पुरेसे अंतर, कामाच्या वेळादरम्यान पुरेसे अंतर, त्याचबरोबर
कर्मचाऱ्यांच्या जेवणाच्या वेळामध्ये सामाजिक अंतराचा नियम पाळणे बंधनकारक राहील.

प्रतिबंधीत क्षेत्र

10. महाराष्ट्र शासनाचे आदेश दिनांक 19 मे, 2020 आणि दिनांक 21 मे, 2020 मध्ये नमूद केल्याप्रमाणे
प्रतिबंधीत क्षेत्राची वर्गवारी पुढील आदेशापर्यंत कायम राहील.
11. प्रतिबंधीत क्षेत्र निश्चित करण्याबाबत व त्या क्षेत्रातील नियमनाबाबत केंद्र शासन व राज्य शासनाने
वेळोवेळीनिर्गमित केलेले मार्गदर्शक तत्वे पुढील आदेशापर्यंत लागू राहतील.

रत्नागिरी जिल्हयात प्रतिबंधीत असलेल्या बाबी

12. शाळा, कॉलेज, शैक्षणिक / प्रशिक्षण / शिकवणी देणाऱ्या संस्था इत्यादी हेदिनांक 31 ऑक्टोबर, 2020
पर्यंत बंद राहतील. तथापि ऑनलाइन(Online) / दूरस्थ ( Distance Learning) शिक्षणास परवानगी
राहील.
13. चित्रपटगृहे, जलतरण तलाव, मनोरंजन पार्कस्, थिएटर, नाटयगृहे (मॉल व मार्केट कॉम्प्लेक्ससह),
ऑडिटोरियम, असेंब्ली हॉल या सारखी तत्सम सर्व ठिकाणे बंद राहतील.
14. सर्व सामाजिक / राजकीय / खेळ / करमणूक / शैक्षणिक / सांस्कृतिक / धार्मिक – कार्ये / इतर मेळावे
आणि धार्मिक सभा / परिषदा यांना बंदी असेल.

नियंत्रित वापरामध्ये सुरु ठेवण्याच्या बाबी / कार्ये

1. खालील बाबींना / क्षेत्रांना सशर्त परवानगी असेल –
* हॉटेल्स/ फूड कोर्टस् / रेस्टॉरंटस् आणि बार आस्थापनेच्या क्षमतेच्या 50% क्षमतेसह किंवा स्थानिक प्रशासनाने ठरवून
दिलेल्या निकषाप्रमाणे सुरू राहतील. सदर आस्थापना सुरु करणेसाठी घ्यावयाच्या आवश्यक दक्षतेबाबत पर्यटन
विभाग, महाराष्ट्र शासन यांचेकडून दिलेल्या मार्गदर्शन सुचनांचा अंमल करणे बंधनकारक राहील.
2. ऑक्सिजन उत्पादन व वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या हालचालीस कोणत्याही प्रकारचे वेळेचे बंधन असणार नाही. तसेच
ऑक्सिजनच्या उत्पादन आणि पुरवठयावर कोणतेही निर्बंध असणार नाहीत.
3. सर्व प्रकारची जिवनावश्यक वस्तू असलेली दुकाने / आस्थापना या पूर्वी दिलेल्या आदेशामध्ये नमूद
असलेप्रमाणे यापुढेही सुरू राहतील.
4. यापूर्वी वेळोवेळी परवानगी दिलेल्या बाबी / क्षेत्रे पुर्ववत राहतील आणि यापूर्वी दिलेले आदेश सदर आदेशास संलग्न
राहतील आणि सदरचे आदेश दिनांक 31 ऑक्टोबर, 2020 पर्यंत अस्तित्वात राहतील व त्यानंतर पुढील कालावधीसाठी
शासनामार्फत जे आदेश प्राप्त होतील त्यानुसार पुरवणी आदेश काढणेत येतील.
5. कोणत्याही विशेष / सर्वसाधारण आदेशाप्रमाणे परवानगी दिलेल्या बाबी चालू राहतील.

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
http://kokanlivebreaking.live

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
https://twitter.com/livekokan

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IJOGnULTOy78rfR0Mo6Uk2

*🔥घरच्या जेवणासह नाश्त्याची चव आता सावंतवाडीत तीही खिशाला परवडणारी…🔥*

    *_💥 आरोलकर खानावळ  💥_*
_शाकाहारी,मांसाहारी जेवण फक्त पार्सल सुविधा उपलब्ध…🛍️_

*🌈नाश्ता २० रुपये पासून!💰*
_घावणे चटणी,घावणे उसळ,शिरा,उपमा,पोहे,मिसळपाव,भजी,वडा,इडली,स्पेशल मेदूवडा,ब्रेड पकोडा…._

*🤷🏻‍♀️बुधवार,शुक्रवार,शनिवार,रविवार🤷🏻‍♂️*
😍 😝 _चिकन पाव_ 😝😍

*💂🏻‍♀️अस्सल मालवणी चुलीवरचे जेवण!*
_💫शाकाहारी जेवण ७० रुपये.._
_💫मांसाहारी जेवण ११० रुपये.._
_💫डबा घरपोच मिळेल.._
_💫पार्टी ऑर्डर्स स्विकारल्या जातील.._
_💫रोजच्या डब्याची ऑर्डर स्विकारली जाईल.._

*🔮संपर्क : महेश आरोलकर*
_तोरणे पाणंद, सबनिसवाडा,_
_सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग._
*_📱मोबाईल : 9867245572_*
*_7400237572_*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!