भरणी गाव आणि भरणी तांबळवाडीच्या दोन्ही हद्दी, अंतर्गत वाटा सील – जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे
🎥 कोकण लाईव्ह ब्रेकींग
अचुक बातमी थेट हल्ला
✍️प्रतिनिधी : रविकांत जाधव
🎴कणकवली : दि. २५ गेल्या काही दिवसात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने, त्यातच सरपंच आणि त्या वाडीतील एक व्यक्तीचा मृत्यु झाल्याने जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी २४ मे रोजी रात्री पाऊणे नऊ वाजता भरणी गावात जाऊन सुमारे एक तास भर भरणी आणि तांबळवाडी परिसराचा आढावा घेतला.
त्यावेळी सोबत प्रांताधिकारी वैशाली राजमाने, तहसीलदार आर. जे. पवार, बी. डी. ओ. अरुण चव्हाण, विस्तार अधिकारी वारंग, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. पोळ, पोलीस उपअधिक्षक, पोलीस निरीक्षक, ग्रामसेवक निर्मल, तलाठी कोरगांवकर, आरोग्य सहाय्यक ठाणेकर, चव्हाण, पं. स. सदस्य गणेश तांबे, पोलीस पाटील ताम्हणकर, अनिल बागवे, अनिकेत गुरव, सुनील तांबे,आदी जण उपस्थित होते.
भरणीत एकूण पॉझिटीव्ह रुग्णसंख्या ३८, रिकव्हर ५ रुग्ण, मृत्यु २ रुग्ण, २२ रुग्ण केअरसेंटर येथे, सद्यस्थितीत ॲक्टीव्ह रुग्ण ३१ या सर्व बाबींची दखल घेत पोलीस अधीक्षक दाभाडे यांनी २५ रोजी सकाळी भरणी, भरणी तांबळवाडीच्या दोन्ही हद्दी, अंतर्गत वाटा सील करणे, भरणी तांबळवाडी परिसर सॅनिटाइझ करणे, आदी अनेक प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याबाबत ग्राम सनियंत्रण कमिटी भरणी आणि सबंधित यंत्रणांना आदेश दिले आहेत.