आणखीकोकणमहाराष्ट्ररत्नागिरी

◼️काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले काँग्रेस तालुका अध्यक्ष प्रशांत यादव यांचे सांत्वन

 

◾पटोले यांचा जिल्ह्यात तोक्ते वादळ नुकसानीचा पाहणी दौरा सुरू..

🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज

✍️ प्रतिनिधी : ओंकार रेळेकर

🎴चिपळूण, दि-२४ :- आपल्या मतोश्रीचे निधन झाले समजले खूप दुःख वाटले कोरोना संकट काळ आणि महाराष्ट्र आघाडी सरकारवरची वाढलेली जबाबदारी या मुळे येता आले नाही मी आपल्या दुःखात सहभागी आहे. आपल्या नेतृत्वाखाली चिपळूण तालुक्यात काँग्रेस पक्षाने चांगली उभारी घेतली आहे अशा शब्दात सांत्वन करतांनाच प्रशांत यादव यांच्या पक्ष वाढीच्या कामाचे काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष ना.नाना पटोले यांनी कौतुक केले.या वेळी यादव यांच्या सोभाग्यवती सौ. स्वप्ना प्रशांत यादव उपास्थित होत्या.

कोकणात आलेल्या तौक्ते वादळात नुकसानी झालेल्या भागाची पाहणी करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले शनिवारी रात्री उशिराने चिपळूण मध्ये आले. या वेळी त्यांच्या सोबत माजी मंत्री काँग्रेसचे माजी आ.माणिक जगताप,हुसेन दलवाई आदी उपस्थितहोते.अलिबाग,पेण,नागोठणे,

माणगांव,महाड ,पोलादपूर,खेड येथून शनिवारी सकाळ पासून सुरू झालेला दौरा आटपून पटोले शनिवारी रात्री उशिराने चिपळूण ला दाखल झाले.चिपळूण तालुका राष्ट्रीय काँग्रेस तालुका अध्यक्ष प्रशांत यादव यांच्या मातोश्रीचे कराड येथील निवासस्थानी नुकतेच निधन झाले आपल्या आईच्या निधनाचे दुःख असतांनाही सतत पक्षकार्याची तळमळ असणाऱ्या प्रशांत यादव यांनी कोरोना संकट काळात आपले सामाजिक दायित्व निभावत शक्य होईल त्या त्या ठिकाणी मदत कार्य सुरूच ठेवले शिवाय नुकत्याच आलेल्या तोक्ते वादळातही तालुक्यात पक्ष कार्यकर्ते आणि नागरिकांची ते सतत विचारपूस करीत आहेत.शनिवारी कोकण दौऱ्यावर आलेले काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी रात्री प्रशांत यादव यांच्या निवास्थानी जाऊन सांत्वन केले रत्नागिरी जिल्हा इंदिरा काँग्रेस पक्षामध्ये ठराविक कार्यकर्त्यां मध्ये प्रशांत यादव हे नाना पटोले यांच्या अत्यंत जवळचे कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात या पूर्वीही मुंबई प्रदेश कार्यालयात पटोले यांनी यादव यांच्या पाठीवरवर कौतुकाची थाप मारली आहे.चिपळूण तालुका अध्यक्ष पदाची सूत्रे यादव यांच्या हाती आल्या पासून दिवसागणिक चिपळूण संगमेश्वर विधानसभा क्षेत्रात काँग्रेस पक्षाने चांगलीच उभारी घेतली आहे.काही महिन्यांपूर्वी झालेल्या खेर्डी ग्रामपंच्यात निवडणुकीत प्रशांत यादव खरे विजयाचे शिल्पकार ठरले होते.चिपळूण तालुक्यातील यशस्वी नेतृत्वामुळे प्रशांत यादव यांनी संपूर्ण जिल्ह्याचे नेतृत्व करावे अशी मागणी कार्यकर्त्यांकडून जोर धरू लागली आहे.शनिवारी कोकण दौऱ्यावर आलेले मदत व पुनर्वसन मंत्री ना. विजय वडेट्टीवार यांच्या दौऱ्याचेही प्रशांत यादव यांनी उत्कृष्ट नियोजन केले होते.जिल्हयात नुकसानग्रस्त शेतकरी,मच्छिमार,आंबा बागायतदार यांनी शासनाने जास्तीत जास्त मदत करावी अशा मागणीचे निवेदन यादव यांनी ना.वडेट्टीवार यांना दिले आहे.शनिवारी रात्री उशिराने पटोले यांचे चिपळूण मध्ये आगमन झाले या वेळी बहाद्दूरशेख नाका येथे कार्यकर्त्यांनी त्यांचे जोरदार स्वागत केले.चिपळूण तालुका काँग्रेस प्रवक्ते वासुदेव मेस्त्री, अल्पसंख्याक अध्यक्ष अन्वर जबले, शशांक यादव,गुलजार कुरवले,शाहीद कुरवले,चिपळूण तालुका युवक काँग्रेस तालुका उपाध्यक्ष रुपेश आवले. युवक काँग्रेस शहराध्यक्ष फैसल पिलपिले आदी कार्यकर्ते या वेळी उपस्थित

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!