आणखीकोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

◾रोटरी क्लब, सावंतवाडीच्या वतीने तीन सुत्री “आशाकिरण” कार्यक्रम..

🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज

✍️ प्रतिनिधी : प्रथमेश गावडे

🎴सावंतवाडी, दि-२२:- भारतात कोरोनाचा कहर थांबण्याची चिन्हे दिसत नाही. सर्वत्र रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. यासाठी रोटरी क्लब, सावंतवाडीनी तीन सुत्री “आशाकिरण” हा कार्यक्रम आखला असुन सावंतवाडी आणि परिसरातील रुग्णाना त्याचा फायदा घेता येणार आहे.

1.आॕक्सिजन अभावी अनेकांचे मृत्यू होतात ही गांभिर्याची बाब ओळखुन आॕक्सिजन काॕन्सट्रेशन मशीन पुढील 2/4 दिवसात योग्य अशा रुग्णालयाला देण्यात येणार आहे. त्यामुळे काही रुग्णांचे प्राण वाचु शकतील.

2. जे रुग्ण पाॕझिटीव्ह आहेत आणि घरातुन उपचार (Home Isolation) घेत आहेत अशा रुग्णाना वैधकीय सल्ल्याची नितांत गरज असते. यासाठी रोटरी क्लब, सावंतवाडीनी *रो.डॉ.स्नेहल गोवेकर* यांची या कामी नेमणूक केली आहे. ज्या रुग्णांने आॕन-लाईन सल्ल्याची गरज आहे त्यानी मो.नं. 9422373922 शी संपर्क साधुन आॕन-लाईन सेवा घ्यावी असे कळविण्यात येत आहे.

3.कोविडच्या आजारातुन बाहेर पडल्या नंतरही अशा रुग्णाना श्वसनाचा त्रास जाणवू शकतो. यासाठी अशा रुग्णांना योगासने, प्राणायाम करणे आवश्यक असते. यासाठी शास्रशुद्ध पद्धतीने ही आसने करणे गरजेचे असते. यासाठी रोटरी फिजिओथेअरपी सेंटर मार्फत *डॉ.रुक्विया खान* या आॕन-लाईन प्रशिक्षण देण्यात येणार आहेत. ज्याना ही सेवा घेण्याची इच्छा आहे त्यानी मो.क्र.8050526424 फोन करावा.

4. कोविड रुग्णांसाठी प्रतिकार शक्ती वाढण्यासाठी आहारविषयक सल्ला मिळविण्यासाठी *रो.विनया बाड* याना मो क्र.9421222999 वर खालील वेळेत फोन करावा.

या तिन्ही सेवा घेण्यासाठी कृपया सकाळी 10 ते सायं.5 वा. फोन करुन अपॉइंटमेंट यावी असे आवाहन रोटरी क्लब, सावंतवाडीचे अध्यक्ष रो. डॉ. राजेश नवांगुळ केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!