आणखीकृषिकोकणमहाराष्ट्रवैभववाडीसिंधुदुर्ग

◾वैभववाडी तालुका कृषी विभाग व तालुका खरेदी विक्री संघ कोल्हापूर यांच्या संयुक्तविद्यमाने राबविला अभिनव उपक्रम..

🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज

✍️ प्रतिनिधी : संजय शेळके

🎴वैभववाडी, दि-२२ :- कोरोना काळात शहरात भात बियाणे खरेदीसाठी येण परवडणारे नाही ही बाब लक्षात घेऊन तालुका कृषी विभाग व तालुका खरेदी विक्री संघ कोल्हापूर यांच्या संयुक्तविद्यमाने अभिनव उपक्रम राबविला.शेतकऱ्यांना घरपोच भात बियाणे देऊन त्यांचा त्रास वाचविला आहे. तालुक्यातील सोनाळी व कुंभवडे येथून या उपक्रमाला प्रारंभ करण्यात आला आहे.शेतकऱ्यांना भात बियाणे खरेदीसाठी शहरात याव लागत.सध्याच्या कोरोनाकाळात शहरात येणे धोकादायक आहे. तसेच शेतकऱ्यांना ते परवडणारे देखील नाही. ही बाब लक्षात घेऊन तालुका कृषी विभागाकडून उपक्रम राबविण्यात आला आहे. शेतकऱ्यांना बांधावर जाऊन भात बियाणे वाटप करण्यात येत आहे. या उपक्रमाचा शुभारंभ तालुक्यातील सोनाळी, कुंभवडे या गावातून झाला. या दोन्ही गावात मिळून १०० शेतकऱ्यांना भात बियाणांची ६५०किलोची विक्री करण्यात आली. या उपक्रमाचे शेतकऱ्यांकडून कौतुक होत आहे.या उपक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी तालुका कृषी अधिकारी सचिन कांबळे, मंडळ अधिकारी दत्तात्रय गिरी,कृषी सहायक प्रकाश लांबोर,विश्वजीत पाटील,कुंभवडे उपसरपंच विनोद कदम,ग्रामसेवक श्री कोलते, सुनील चाळके,महेश सुतार, सुरेश चव्हाण, संजय आमकर,बाळा बोभाटे,संतोष नर आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!