◾पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार जिल्ह्यात आल्यावर करणार निषेध व निदर्शने ; ॲड.सुहास सावंत
🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
✍️ प्रतिनिधी : प्रशांत मोरजकर
🎴सावंतवाडी, दि-२० :- राज्याचे पुनर्वसन मंत्री २१ मे रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येण्याची शक्यता आहे.ते कायद्याप्रमाणे गोपनीयतेची शपथ घेऊन मंत्री झाले आहेत.परंतु त्यांनी मंत्रीपदावर असताना मराठा आरक्षणाचा घटनाबाह्य विरोध केला आहे.म्हणून जिल्ह्यातील तमाम मराठा बांधवांनी त्यांच्या भेटीच्या वेळी सहकार्य करु नये.तसेच मंत्री वडेट्टीवार जिल्ह्यात आल्यावर त्यांना निदर्शने करावयाची आहेत,म्हणून तमाम मराठा बांधवांनी एकजूटीने मला सहकार्य करावे असे सकल मराठा समाजाचे नेते अॕड.सुहास सावंत यांनी कळविले आहे.ज्या मराठा बांधवांना सदर निदर्शने करण्यासाठी भाग घ्यावयाचा असल्यास त्यांनी ९४२२३८१३१४ या क्रमांकावर संदेश पाठवावा असेही अॕड.सावंत यांनी कळविले आहे.

