◼️वाचन चळवळीतून समाजात वैचारिक क्रांती घडेल ; ॲड.अशोक निकम
◾बामणोली येथे सम्राट बळीराजा वाचनालयाचे सुधीर तांबे यांच्या हस्ते झाले उदघाटन..
🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
✍️ प्रतिनिधी : ओंकार रेळेकर
🎴चिपळूण, दि-१५ :- समाजात वैचारिक परिवर्तन घडविण्यासाठी वाचन चळवळ उभी राहणे अत्यंत महत्वाचे आहे. आजची पिढीला वाचनातून प्रगल्भ बनू शकते. आपल्या ज्ञानाला वाचनामुळे तेजस्वी विचारांची जोड मिळते. समाजातील अज्ञानाचा अंधकार दूर करण्यासाठी गावागावात वाचनालय निर्माण करून भावी पिढीत वाचन सजगता निर्माण केली पाहिजे, असे मत सामजिक कार्यकर्ते आणि ऍड.अशोक निकम यांनी वाचनालयाच्या उदघाटन प्रसंगी व्यक्त केले.
तालुक्यातील बामणोली येथे कुणबी समाजोन्नाती संघ शाखा चिपळूण संलग्न कुणबी युवा चिपळूण पुरस्कृत ” सम्राट बळीराजा वाचनालयाचे” उदघाटन छत्रपती संभाजी महाराज जयंतीचे औचित्य साधून जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुधीर तांबे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विचार मंचकावर कार्यक्रमाचे अध्यक्ष बाबुराव डिंगणकर, माजी सरपंच तानाजी वणे, संघ शाखा चिपळूण सचिव दीपक पागडे, उदघाटक सुधीर तांबे, ॲड.अशोक निकम, मराठा सेवा संघ रायगड जिल्हाध्यक्ष प्रकाश चांदीवडे, अशोक वणगे, संतोष गोरीवले, माजी सरपंच दत्ताराम फावरे, सुरेश चांदीवडे, मंगेश वणे, महादेव पवार , गोविंद कीजबिले आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमात पुढे श्री निकम म्हणाले की, सम्राट बळी राजाच्या नावाने ग्रामीण भागात वाचनालय सुरू करणे ही संकल्पनाच अभिमानाची आहे. कुणबी युवा चिपळूणच्या शिलेदारानी यातूनच आपल्या कामाची वेगळी झलक दाखवून दिली आहे. या उपक्रमामुळे बळी राजा बहुजनांना कळू शकेल. आताच्या युवा पिढीने जर सम्राट बळीराजा समजून घेतला तर समाजात निश्चित वेगळी क्रांती घडू शकते. यासाठी अशा वाचन मंदिरांची उभारणी सद्यस्थितीत महत्त्वाची आहे. त्यामुळे वाचन चळवळ पुन्हा दृढ करण्यासाठी बामणोली मधील हे वाचनालय एक आदर्श ठरेल अशा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
या कार्यक्रमात वाचनालयाचे उदघाटक सुधीर तांबे यांनी सांगितले की, कुणबी युवाचा हा उपक्रम दखल पात्र आहे. त्यांनी छत्रपती संभाजी महाराज जयंतीचे औचित्य साधून सम्राट बळीराजा वाचनालयाचे उदघाटन केले यावरून त्यांच्या वैचारिक आणि सामाजिक कामाची कल्पना स्पष्ट होते. हे वाचनालय गावाच्या वैचारिक वैभवात भर टाकणारे ठरेल असे त्यानी गौरव उदगार काढले. यावेळी प्रकाश चांदीवडे, दीपक पागडे , तानाजी वणे व महादेव पवार यांनीही आपले विचार मांडले. कुणबी युवा चिपळूणचे प्रभारी सचिव कल्पेश बाईत यांनी या वाचनाल्याची संकल्पना आणि युवाचे कार्य याबाबत माहिती दिली. या कार्यक्रमाला कुणबी युवा चिपळूणचे संघटक नितेश खाडे, संदीप मोरे, युवा शिलेदार कु वेदांत धुलप उपस्थित होते तर स्थानिक मंडळाचे राजाराम घाणेकर, कृष्णा कुळे यशवंत डिंगणकर, लक्षमन तांबिटकर, रामचंद्र डिंगणकर, गंगाराम कुळे दत्ताराम कुळे, सोनू कुळे, लक्ष्मण तांबिटकर, संदीप डिंगणकर, रोशन डिंगणकर, आणि युवा कार्यकर्ते उपस्थित होते. वाचनालय उपक्रमा साठी कुणबी युवा चिपळूणच्या सर्व पदाधिकारी सदस्य आणि कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली आहे. कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन शिक्षक संदेश कुळे यांनी केले तर आभार भाई कुळे यांनी मानले.

