आणखीआरोग्यकोकणमहाराष्ट्रवेंगुर्लेसामाजिकसिंधुदुर्ग

◾म्हापण ग्रामपंचायतीतर्फे म्हापण गावातील 45 वर्षांवरील नागरिकांना लसीकरण..

 

◾जिल्हा आरोग्य विभाग व प्राथमिक आरोग्य केंद्र परुळेच्या सहकार्याने पार पडले लसीकरण..

◾अशाप्रकारे ग्रामपंचायत मध्ये लसीकरण मोहीम राबविणारी “म्हापण ग्रामपंचायत” ठरली दशक्रोशितील पहिलीच ग्रामपंचायत..

◾आमदार दीपक केसरकर यांच्या विशेष प्रयत्नातून पार पडला स्तुत्य उपक्रम ; ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण..

🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज

✍️ प्रतिनिधी : समीर चव्हाण

🎴वेंगुर्ले, दि-१३ :- म्हापण गावातील कोरोणा रुग्णसंख्या दरदिवशी वाढत असली तरी कोरोणावर आळा घालण्यासाठी नवनवीन उपाय योजना ग्रामपंचायतच्या माध्यमातुन आखण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आज म्हापण ग्रामपंचायतमध्ये जिल्हा आरोग्य विभाग व प्राथमिक आरोग्य केंद्र परुळे यांच्या सहकार्यातून ४५ वर्षावरील नागरिकांना कोविडशिल्ड या कोरोणा प्रतिबंधक लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. आज १३० ग्रामस्थांना लसीकरण करण्यात आले. विशेष म्हणजे अशाप्रकारे ग्रामस्थांना ग्रामपंचायतमध्ये लसीकरण मोहीम राबविणारी “म्हापण ग्रामपंचायत” ही म्हापण दशक्रोशितील पाहिलीच ग्रामपंचायत ठरली आहे. ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीच्या या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक केले व ग्रामपंचायत कोरोणाच्या या कठीण काळात करत असलेल्या कार्याबद्दल समाधान व्यक्त केले.

या लसीकरण मोहिमेत आमदार दीपक केसरकर यांचे सुध्दा विशेष सहकार्य लाभले. म्हापण ग्रामपंचायत प्रमाणेच केळुस व कोचरा ग्रामपंचायतमध्ये सुध्दा अशाच प्रकारचा लसीकरण उपक्रम राबविण्याचा मानस आमदार केसरकर यांचा आहे अशी माहिती म्हापण सरपंच अभय ठाकूर यांनी दिली.

इतर ग्रामपंचायतींनी सुध्दा अशाप्रकारचे पुढाकार घेऊन लसिकरण उपक्रम राबविले तर लसीसाठी होणारी ज्येष्ठ नागरिकांची हेळसांड थांबेल व जास्तीत जास्त ग्रामस्थांना लसीकरण करण्यात प्रशासनाला सुध्दा मदत होईल.

या लसीकरण मोहिमेसाठी वैद्यकीय अधिकारी डॉ. धनश्री हिरेमठ, आरोग्य सहाय्यक प्रा. आ. केंद्र परुळे श्रीमती टी डी मुणनकर, आरोग्य सेविका श्रीमती शलाका शरद वालावलकर, आरोग्य सेवक प्रवीण रामचंद्र परब, श्रीमती रंजना रमेश मुंडये, म्हापण सरपंच श्री अभय गंगाधर ठाकूर, उपसरपंच श्री अशोक रमाकांत पाटकर, डाटा ऑपरेटर रघुनाथ अनंत जुवाटकर, ग्रा. शिपाई सावळाराम बाळकृष्ण म्हापणकर व ग्रामस्थ जगदीश मोहन म्हापणकर ई. उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!