शैक्षणिकसिंधुदुर्ग

सिंधुदुर्गात राज्य सेवा पूर्व परीक्षा ११ ऑक्टोबर रोजी..

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत जिल्ह्यातील तीन केंद्रावर घेण्यात येणार..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : गणेश तोडकर

🎴सिंधुदुर्गनगरी,दि.०७: महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणारी राज्य सेवा पूर्व परीक्षा रविवार दिनांक ११ ऑक्टोबर २०२० रोजी जिल्ह्यातील तीन केंद्रावर घेण्यात येणार आहे. सकाळी १० ते दुपारी १२ आणि दुपारी ३ ते सायं. ५ या वेळेत विद्यामंदिर माध्यमिक प्रशाला, कणकवली, कणकवली कॉलेज, कणकवली, एस.एम. हायस्कूल, कणकवली येथे ही परीक्षा होणार आहे.

सदर परीक्षेसाठी येताना विद्यार्थ्यांनी पुढील साहित्य घेऊन यावे. काळ्या शाईचे बॉल पॉईंट पेन, पेन्सिल व आयोगाने परवानगी दिलेले साहित्या, प्रवेश पत्र आणणे सक्तीचे आहे, ओळखीच्या पुराव्यासाठी आधार कार्ड, निवडणूक आयोगाचे ओळखपत्र, पासपोर्ट, पॅनकार्ड किंवा स्मार्ट कार्ड प्रकारचे ड्रायव्हिंग लायसन्स या पैकी किमान एक मूळ ओळखपत्र तसेच त्याची छायांकीत प्रत सोबत आणावी.

तसेच पुढील साहित्य परीक्षा केद्रावर सोबत आणण्यास मनाई आहे. स्मार्ट वॉच, डिजीटल वॉच, मायक्रोफोन, मोबाईल फोन, कॅमेरा अंतर्गभूत असलेली कोणत्याही प्रकारची साधने, सिमकार्ड, ब्लू टूथ, दूरसंचार साधन म्हणून वापरण्यायोग्य कोणताही वस्तू, इलेक्ट्रॉनिक उपकरणे, वह्या, नोट्स, परवानगी नसलेली पुस्तके, बॅग्ज, पॅड, पाऊच, परिगणक इ. प्रकारची साधने, साहित्य परीक्षा केंद्राच्या परिसरात तसेच परीक्षा कक्षात आणण्यास व बाळगण्यास सक्त मनाई आहे.

विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर परीक्षा वेळेच्.या किमान एक तास आधी उपस्थित रहावे. सदर परीक्षा सुरळीतपणे व शांततेत पार पाडण्यासाठई विद्यामंदिर माध्यमिक प्रशाला, कणकवली, एस.एम. हायस्कूल, कणकवली, कणकवली कॉलेज, कणकवली या केंद्राजवळच्या २०० मीटर परिसरातील सर्व सार्वजनिक टेलिफोन, एस.टी.डी., आय.एस.डी. फॅक्स केंद्र, ध्वनीक्षेपक सकाळी ८:०० ते सायं. ५:०० या वेळेत बंद ठेवण्याबाबत तसेच परीक्षेच्या उप केंद्रावर व आवारात कोणत्याही अनधिकृत व्यक्तीस, वाहनास प्रवेश न देण्याबाबत फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ अन्वये कार्यकारी दंडाधिकारी कणकवली यांचे मार्फत मनाई आदेश लागू करण्यात आला असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे या कळवितात.

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
http://kokanlivebreaking.live

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
https://twitter.com/livekokan

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IJOGnULTOy78rfR0Mo6Uk2

*🔥आमच्या सुसज्ज ‘स्नेहल निवास’ मधील जागा भाड्याने देणे आहे*🔥

_💫मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गालगत आर.सी.सी. बिल्डिंगमध्ये…_

_💫नांदगाव तिठ्याजवळ 1200 स्केअर फूट व समोर 1000 स्केअर फूट पार्किंग व्यवस्था उपलब्ध.._

_💫हॉटेल, वित्त संस्था, दुकान, ऑफिस, व इतर उपयोगांसाठी भाडे तत्वावर जागा देणे आहे.._

_💫तसेच वन रुम, टू रुम, थ्री रुम किचन ब्लॉक भाड्याने देणे आहेत.._

_💫पाणी 24 तास उपलब्ध.._

*_💥आजच संपर्क साधा! आणि व्हा निश्चिंत!!! 💥_*

*🤷🏻‍♂️ आमचा पत्ता 🤷🏻‍♀️*
*_🏬 स्नेहल निवास_*
*_नांदगाव तिठा जवळ, नांदगाव_*
*_तालुका. कणकवली, जिल्हा. सिंधुदुर्ग_*
*_📱मोबाईल : 9987278080_*
*_9969198433_*
*_9730425324_*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!